दत्तात्रय घाडगे यांची महा.राज्य मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
सातारा l प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई तर्फे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दत्तात्रय कृष्णत घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य संघटक मा. संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष मा. गोविंद वाकडे व प्रदेश सरचिटणीस मा. विश्वासजी आरोटे यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत राहून विविध उपक्रम राबविल्याची दखल घेऊन त्यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हिताचे काम, संघटन मजबूत करणे व संघटनेच्या ध्येय–धोरणांचे अवलंबन करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.
या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नागठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पंचपोर, उपाध्यक्ष विजय घोरपडे, सचिव संदीप जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधवांनीही अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













