सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचा बुद्धिबळात डंका
पंचगणी : पंचगणीतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तालुका स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे.
अंडर-१७ गटात पाच विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यापैकी स्वरा चोरगे, किमया डोईफोडे, स्वरा मालुसरे आणि आर्या निमजे या चार विद्यार्थिनींची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.
तर अंडर-१४ गटात शाळेतील पाच विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामधून ध्रीती मोरे व स्पृहा जाधव यांनी जिल्हा स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळवत शाळेचा मान उंचावला आहे.
या यशामागे शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर ब्लांच, मुख्याध्यापिका सिस्टर ब्रिटो मेरी व पी.टी.आय. सौ. स्वप्ना केळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेतर्फे विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले असून, “विद्यार्थिनी जिल्हा स्तरावरही शाळेचे नाव उज्ज्वल करतील,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.













