Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन
Ashok Ithape
  • PublishedSeptember 13, 2025
सातारा दि.13- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करणेत येणार असल्याची माहिती तहसिलदार समीर यादव यांनी दिली.
 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी सातारा आशिष बारकुल यांच्या मार्गदर्शनांखाली सातारा तालुक्यांत विविध उपक्रम राबविणेत येणार आहे.
पहिला टप्पांमध्ये प्रामुख्याने शिवरस्ते, अतिक्रमण मुक्त करुन त्यांचे सिमांकन करणे व नकाशांवर नोंदी घेणेत येणार आहेत. तसेच खुल्या झालेल्या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे दुतर्फा झाडे लागवड करणेत येणार आहे. त्याअनुषंगाने सातारा तालुक्यांतील सर्व मंडलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियांतर्गत समाधान शिबिर राबविणेत येत आहेत.
दुस-या टप्प्यांमध्ये सर्वासाठी घरे या उपक्रमांतंर्गत शासनांकडून निर्गमीत करणेत आलेल्या शासन निर्णयांचे अनुषंगाने अंमलबजावणी करणे, सन 2011 पुर्वीचे रहिवासी कारणांसाठी केलेले अतिक्रमण नियमांनुकूल करणेबाबत कार्यवाही करणेत येणार आहे.
तिस-या टप्प्यांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणेबाबत निर्देश दिल्यानुसार त्यांमध्ये पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणणेसाठी विशेष प्रयत्न करणे, ई-पिक पाहणी व फार्मर आयडी (ॲग्रीस्टॅक) काढणेबाबत कॅम्प् घेणे, मोडी लिपिमधील मराठा (कुणबी) नोंदी शोधणे, पुरवठा विभागांमार्फत देणेत येणा-या सेवां अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविणेत येऊन त्यासाठी सर्व रास्त भाव दुकानाचे दर्शनी भागांत क्युआर कोड फलक लावणे. तसेच एकाच नावाच्या अधिक व्यक्ती असल्यास आईचे नांव किंवा टोपण नांव वाढविणे इत्यांदी उपक्रम घेणेत येणार आहेत.
गाव नकाशांमध्ये नसलेले परंतु वहिवाटीत असलेले गाडीरस्ते, पायवाटा यांचे सर्वेक्षण होणार असून अतिक्रमण दिसून आल्यास त्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करुन शेतरस्त्यासाठी शेतक-यांची संमत्तीपत्रे घेतली जाणार आहेत. त्यातूनही विवादग्रस्त राहिलेल्या रस्त्यांबाबत तहसिलदार यांच्या स्तरावर रस्ता अदालत आयोजित करणेत येणार असून सामोपचाराने अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही करणेत येणार आहे. तसेच सदरचे सेवा पंधरवडयांमध्ये केलेल्या कामकाजांचे अनुषंगाने शेतक-यांचा त्याचा लाभ होणार असून रस्त्यांचे ब-याच वर्षापासूनचे वाद मिटणेत आलेले असून शेतीमध्ये जाणेसाठी शेती अवजारे, शेतमाल ने-आण करणेसाठी तसेच शेतीची मशागत करणे सोपे झालेले आहे त्यामुळे शेतक-यांना वरीलप्रमाणे पहिल्या, दुस-या व तिस-या टप्प्यांचे अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत मा. महसूल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हीसी व्दारे सर्व महसूल अधिका-यांना निर्देश दिलेले आहेत. महसूल विभागाच्या सर्व सेवा योजना शेतक-यांपर्यंत पोहोचविणेसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने सातारा तालुक्यांमध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून सातारा तालुक्यांतील सर्व नागरीकांनी सेवा पंधरवडयांमध्ये देणेत येणा-या सेवा योजना लाभ घेणेबाबत आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!