Thu, Jan 15, 2026
योजना

कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने कातकरी समाजाला घरकुलाची भेट; जीवनमान उंचावण्यास मदत.

कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने कातकरी समाजाला घरकुलाची भेट; जीवनमान उंचावण्यास मदत.
Ashok Ithape
  • PublishedSeptember 13, 2025

कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते कातकरी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित

वाई – प्रतिनिधी : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदी , घरकुल बांधणीसाठीचा प्रथम हप्ता शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी वाटप करण्यात आला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते या अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. यावेळी “वंचित समाजाच्या कल्याणासाठी मी नेहमीच कार्यरत राहीन,” असे प्रतिपादन ना. मकरंद पाटील यांनी यावेळी ग्वाही दिली.

वाई तालुक्यातील वासोळे, कोंढावळे येथील लाभार्थींना जमीन खरेदीसाठी तर पाचवड येथील शासकीय जमिनीवरील लाभार्थींना पहिला हप्ता देण्यात आला.

केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री जनमन योजना ही आदिवासी व वंचित घटकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. त्याअंतर्गत कातकरी समाजातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ते साहाय्य दिले जात आहे. जागा नसलेल्या २२ कातकरी लाभार्थ्यांना पाचवड येथे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे काम तत्कालीन प्रांत राजेंद्र कचरे, तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी आणि तालुका भूमिअभिलेख अधिकारी साठे यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांचे मार्गदर्शन लाभले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी शाम राठोड, उमेश भिसे, ऑपरेटर प्रीतम ओंबळे, पाचवड सरपंच महेश गायकवाड तसेच कातकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!