Thu, Jan 15, 2026
ग्रामीण बातमीपत्र

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंमलबजावणीसाठी 11 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंमलबजावणीसाठी 11 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedSeptember 10, 2025

सातारा, दि.10 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जाबाबदाऱ्या या  माहिती देण्यासाठी उद्या दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुगार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अभियानची उदिष्टपूर्तीसाठी व  अभियानाची सातारा जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी विविधस्तरावर कार्यशाळाचे आयोजन येणार आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची संकल्पना, रूपरेषा, उद्दिष्टे व अमलबजावणी या विषयी सविस्तर मार्गदर्शन व माहिती, पंचायत व ग्राम स्तरावर करावयाच्या उपक्रमांची माहिती, अभियानात सहभागी होणाऱ्यांच्या           जबाबदाऱ्या, प्रभावी नियोजन व कार्यपध्दती या सर्व बाबींवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तरी   कार्यशाळेस नेहरु युवा केंद्र, भजनी मंडळ, वारकरी व पाणी-फाऊंडेशन व समाज प्रबोधन संस्था, व्यक्ती कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!