Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप

राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप
Ashok Ithape
  • PublishedSeptember 7, 2025

मुंबई, : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहेत्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला.

 राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमंत्री मंगलप्रभात लोढाकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेराज्यमंत्री योगेश कदमआमदार अमित साटममुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी तसेच हजारो भाविक यांची उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात वातावरण भारावून गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससभापती प्रा.राम शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला.

 राज्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकांनी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. बाप्पाच्या विसर्जनावेळी मनात थोडीशी खंत व दु:ख होतेकारण दहा दिवसांनी बाप्पा आपल्याला सोडून जातात. पण याचबरोबर पुढच्या वर्षी ते परत येणार आहेत याचा आनंदही असतो, असे श्री.फडणवीस म्हणाले.

 मुंबईपुणे तसेच राज्यातील सर्व शहरांमध्येगावांमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडल्या. पोलीस विभागमहानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे हा उत्सव सुरळीत पार पडला. त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याला मुंबईकरांसोबत विविध मान्यवरांचीही उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिकापोलिस व स्वयंसेवकांच्या मदतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!