Mon, Mar 2, 2026
सामाजिक

पाचगणीत महाराणा प्रताप मित्र मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम

पाचगणीत महाराणा प्रताप मित्र मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम
Ashok Ithape
  • PublishedSeptember 4, 2025

पाचगणी : प्रतिनिधी l धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीची जपणूक करत महाराणा प्रताप मित्र मंडळ, पाचगणी आपल्या ३९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने गुरुवार दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य श्री सत्यनारायण महापूजा, मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्तदान, मधुमेह व रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

गोपाळकृष्ण नेत्र चिकित्सालय यांच्या तर्फे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी होणार असून, रक्तदानासह आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ पाचगणी व परिसरातील सर्वांना घेता येणार आहे.

स्थान: महाराणा प्रताप मित्र मंडळ, राधाकृष्ण मंदिर, पाचगणी
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी २.००

मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश राजाराम साळुंखे, उपाध्यक्ष श्री. गणेश विनायक प्रभाळे, सचिव श्री. संदीप पांडुरंग सपकाळ तसेच मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री. अमित (दादा) मोहन भिलारे व सर्व सभासदांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

१९८७ साली स्थापन झालेले मंडळ आज ३९ वर्षांचा प्रवास पूर्ण करून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात आपली ओळख निर्माण करत आहे.

🔹 “रक्तदान हेच महादान – चला समाजासाठी हातभार लावूया!”
🔹 “नेत्रदान करा, प्रकाशाचा वारसा जपा!”
🔹 “आरोग्य तपासणी हीच खरी बचावाची किल्ली”
🔹 “सेवेतूनच समाधान – महाराणा प्रताप मित्र मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम”

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!