Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

पर्यटकांसाठी पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शनासाठी सहलीचे आयोजन

पर्यटकांसाठी पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शनासाठी सहलीचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 29, 2025

सातारा दि. 28 : पर्यटन संचालनालयाव्दारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच राज्यात देशी- विदेशी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. पुण्यात विविध सार्वजनिक गणेशेत्सव मंडळाव्दारे साजरा करण्यात येणारे गणेशोत्सव मोठया- मोठया व आकर्षक मुर्ती व विसर्जन सोहळा यांचे देश- विदेशातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच गणेशोत्सव हा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केले आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच आपल्या पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी – विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्म‍क प्रसिध्दी देऊन राज्यात पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाव्दारे व पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. व पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात देशी – विदेशी पर्यटकांसाठी पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन सहलीचे आयोजन करणेत येत आहे.

या उपक्रमाअंतर्गंत वय 60 वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता व दिव्यांग व्यक्तींना गणेश दर्शन सहल आयोजित करण्यात येत आहे. दि. 1 सप्टेंबर, 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी त्रिशुंडया गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, बाबू गेनू गणपती व अखिल मंडई मंडळ या गणपतींच्या  थेट दर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहराकडे येणाऱ्या पाच मार्गांवरील बस डेपो हे Pick Up व Drop Points निश्चित करणेत आले आहेत. इच्छुकांसाठी दि. 1 सप्टेंबर, 2025 रोजी स. 8.30 ते दु. 1.30 वाजेपर्यंत कात्रज डेपो, हडपसर (गाडीतळ), कोथरुड डेपो, शिवाजीनगर (मॉडेल कॉलनी) व येरवडा (गुंजन टॉकीज) या डेपोमधून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांच्या 5 वातानुकूलीत बसेस (प्रती बस 35 प्रवासींकरीता) उपलब्ध करून देणेत येतील.

          ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विभागाव्दारे गाईड, अल्पोपहार, बिसलेरी पाणी व आरोग्य सेवक (प्रथमोपचार किट सह) इत्यादीची सोय करण्यात येणार आहे. नाव नोंदणीकरणेरिता संपर्क क्रमांक गणेश बेंद्रे – 9730993282 करावा व Google Form – https://forms.gle/BbE36QZDyasCGH2SA व  QR Code सोबत जोडण्यात येत आहे. सदर Google Form वर नोंदण करण्यात यावी. तसेच, सदर गणेश दर्शन सहलीस जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन  उपसंचालक यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!