Thu, Jan 15, 2026
शिक्षण

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी
Ashok Ithape
  • PublishedAugust 27, 2025
सातारा दि. 26 – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेद‌वारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि 22 सप्टेंबर ते  1 ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६२ आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे.
मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-६२ कोर्ससाठी (किंवा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पुर्ण भरून सोबत घेवून यावे, असे आवाहन, ले. कर्नल हंगे स. दे. (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
 एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंबाईड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस. बी. साठी शिफारस केलेली असावी.  टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. वि‌द्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com  व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असेही आवाहन, ले. कर्नल हंगे स. दे. (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!