Thu, Jan 15, 2026
शिक्षण

जवाहर नवोदय विद्यालयाचे इयत्ता नववी व अकरावी प्रवेशाकरिता निवड परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयाचे इयत्ता नववी व अकरावी प्रवेशाकरिता निवड परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedAugust 26, 2025

सातारा दि.26- जवाहर नवोदय विद्यालय, सातारा २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रवेशाकरिता निवड परिक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती प्राचार्य ॲन्सी ए. जे. यांनी दिली आहे.

यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे सातारा जिल्हयातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ मध्ये इयत्ता नववी प्रवेशासाठी आठवी मध्ये व अकरावी प्रवेशासाठी दहावी मध्ये शिकत असावा. नववीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा 1 मे 2011 पूर्वी व 31 जुलै 2013 नंतर जन्म झालेला नसावा. तर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा जन्म जन्म ०१ जून २००९ पूर्वी व ३१/०७/२०११ नंतर झालेला नसावा. ही अट सर्वांसाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही लागू आहे.

अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, दिव्यांग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. तसेच तृतियपंथीय उमेदवारसुध्दा नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पालकांचे सातारा जिल्हयातील रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी केली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा २०२६ साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबद्वारे नवोदय विद्यालय समितीच्या https://cbseitms.nic.in/2025/nvsxi_11 या वेबसाईट वरती लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याची अंतिम दिनांक २३/०९/२०२५ अशी आहे. परीक्षेची तारीख: शनिवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२६, वेळ-सकाळी ११.३० वाजता अशी आहे, अशी माहिती विद्यालयाकडून देण्यात आली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!