Thu, Jan 15, 2026
महिला विशेष

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत – माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत – माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई
Ashok Ithape
  • PublishedAugust 25, 2025

सातारा दि. 25- सातारा जिल्ह्यातील माविमद्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रमांना राजलक्ष्मी शाह, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मुंबई यांनी भेट दिली.

माविमद्वारा मार्गदर्शित प्रगती लोक संचलित साधन केंद्र साताराद्वारे सुरु असलेल्या हळद उत्पादन व प्रक्रिया या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) या प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या हळद उत्पादन मूल्यसाखळी विकास या उत्पादन व प्रक्रिया आधारित उप प्रकल्प व मदर पोल्ट्री उपप्रकल्प मधील महिलांशी संवाद, तसेच सुपोषण परसबाग आणि अन्नप्रक्रिया सूक्ष्मउद्योग, हळद प्रक्रिया, संकलन केंद्र, कृषी अवजार यासारख्या विविध उपक्रमांना भेट देऊन हळद उत्पादक शेतकरी, प्रगती लोक संचलित साधन केंद्र सातारा, कुक्कुटपालन करणाऱ्या महिला, गांडूळ खत, मध उत्पादन करणाऱ्या महिला, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला, सूक्ष्म उद्योजिका महिला, अर्जका कृषी उत्पादक संस्था सातारा (FPC) च्या संचालक, धावडशी येथील ग्रामपंचायत सदस्य, माविम मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून मार्गदशन केले. माविमच्या सुरु असलेल्या कार्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. तसेच पुढील सर्व कार्यक्रमांसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पुढील उपप्रकल्पांची आखणी करताना दुध व्यवसाय, कृषी उत्पादनां वर आधारित उपप्रकल्पांची आखणी करावी त्याला माविम योग्य ते सहकार्य करेल व सुरु असलेल्या कामाचे योग्य दस्तावेजकरण करण्याच्या सूचना श्रीमती शाह यांनी दिल्या.

याप्रसंगी माविम विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे, विभागीय सल्लागार विलास बच्चे, धावडशी गावाचे सरपंच अरुण कारंडे, सीएमआरसीच्या अध्यक्षा सौ सुरेखा घोलप, सचिव शबाना शेख, प्रगत लोकसंचलित साधन केंद्राचे सर्व संचालक, अर्जका महिला शेतकरी उत्पादक कंपनी, संचालक, माविम साताराच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, लेखाधिकारी आशालता जमणे, जिल्हा प्रकल्प सल्लागार अभिजित काटकर, लेखासहाय्यक मृणाल हुदली, एमआयएस सल्लागार निलेश भूतकर प्रगती लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक पल्लवी दातार, उपजीविका विकास सल्लागार अनिकेत अडसूळ व सीएमआरसीची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!