Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

जीएसटी भवनच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

जीएसटी भवनच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम  डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
Ashok Ithape
  • PublishedAugust 21, 2025

मुंबईदि. २० : वडाळा येथे उभारण्यात येत असलेल्या जीएसटी भवनच्या चार पैकी पहिल्या इमारतीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये मुंबईमधील भाड्याच्या जागेमध्ये असलेली शासकीय कार्यालये स्थलांतरित करावीतअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षामध्ये जीएसटी भवन येथे विविध शासकीय कार्यालयांना जागा वाटप करण्याविषयी बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरजीएसटी आयुक्त आशिष शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            जीएसटी भवनची इमारत कार्पोरेट धर्तीवर तयार करावी असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीया इमारतीमध्ये शासकीय कार्यालयांना जागा देताना नियमाप्रमाणे जागेचे वाटप करण्यात यावे. सध्या भाड्याच्या जागेमध्ये असलेल्या कार्यालयांच्या जागेची माहिती घेऊन जागा वाटप करावी. जागेचे वाटप झाल्यानंतर शिल्लक राहणारी जागा खासगी कंपन्यांना भाड्याने देण्याबाबत प्रस्ताव करावा. शासकीय कार्यालयांना जागा वाटपासाठी अपर मुख्य सचिव वित्त विभागसार्वजनिक बांधकाम विभाग आणि जीएसटी आयुक्त यांची संयुक्त समिती स्थापन करावी,अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

   वडाळा येथील जीएसटी भवन या इमारतीमध्ये उपलब्ध असलेल्या  हजार चौ. फूट जागेमध्ये शासनाची कार्यालये असणार आहेत. तसेच या ठिकाणी मेट्रो स्टेशनउपनगरीय स्टेशनपूर्व मुक्त मार्ग व अटल सेतू या रस्ते मार्गांची चांगली जोडणी असणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!