Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता

सातारा येथे शाश्वत शेती दिन साजरा

सातारा येथे शाश्वत शेती दिन साजरा
Ashok Ithape
  • PublishedAugust 7, 2025
सातारा  – भारतीय हरीतक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन सातारा तालुका कृषी कार्यालयातील कृषी विकास भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. एम. एस.स्वामीनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास आत्मा कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी संचालक सुनील बोरकर, सातारा आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, प्रकल्प उपसंचालक राहुल माने, उपविभागीय कृषी अधिकारी रमेश देशमुख, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी गजानन ननवरे, सातारा तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे आदी उपस्थित होते.
कृषी संचालक आत्माचे श्री. बोरकर यांनी शाश्वत शेती दिन साजरा करणेबाबतचे महत्व विशद करून उपस्थित शेतकर्‍यांना शाश्वत शेती संकल्पना कशा पद्धतीने करावी त्याचे काय फायदे आहेत, आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रगतशील शेतकरी यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कृषी अधिकारी, श्री.सोनवले यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. ढगे यांनी केली. यावेळी सातारा तालुक्यातील, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!