Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

वाई – कुसगाव क्रशरबाबत मकरंद पाटील यांची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची: शिंदे

वाई – कुसगाव क्रशरबाबत मकरंद पाटील यांची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची: शिंदे
Ashok Ithape
  • PublishedAugust 7, 2025

दि. ७  : कुसगाव येथील क्रशरचा मुद्दा पुढे करून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा,राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्रशर प्रश्नात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका कायम ग्रामस्थांच्या बाजूचीच राहील, असे वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पत्रकात म्हटले आहे, नामदार पाटील यांनी कधीही टोकाचे राजकारण केले नाही. कुसगावसह वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांबद्दल त्यांच्या मनात विशेष आस्था राहिली आहे. विकास कामे करतानाही या विभागाकडे त्यांचे अधिकचे लक्ष असते. क्रशरबाबत त्यांनी पार्टेवाडी- एकसर व सातारा येथे बैठका घेतल्या आहेत. नामदार पाटील यांच्या सूचनेनुसारच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाकड, पुणे येथे जाऊन आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर चौकशी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले. त्यानंतर समितीमार्फत क्रशरबाबत वस्तुस्थिती तपासण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी क्रशर, खाणपट्ट्याचे काम बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.

मकरंद पाटील यांची राजकीय वाटचाल शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेस अनुसरून आहे, त्यामुळे कुसगाव परिसरातील जनता, अशा धादांत खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. या प्रश्नावर चुकीचे, बिनबुडाचे आरोप करून कोणीही राजकारण करू नये. असे करणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही पत्रकात श्री. शिंदे यांनी दिला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!