Thu, Jan 15, 2026
शिक्षण

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 7, 2025

सातारा दि. :महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत )पुणे, आणि उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी निशुल्क प्रशिक्षण सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी नियोजित करण्यात आले आहे .

अमृतलक्षित गटातील युवक आणि युवतींसाठी अमृत सूर्य मित्र( सौर) अमृत बेकरी ,अमृत ,आयात -निर्यात आणि अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण (REDP)असे चार प्रकारचे प्रशिक्षण 18 दिवस निवासी विभागीय कार्यालय( एम सी ई डी) पुणे येथे  होणार आहेत , त्याचबरोबर अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम( 21 दिवस ),अमृतांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (30 दिवस) आणि अमृत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (6 दिवस) हे तीन प्रकारचे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपात होणार आहेत, सदरील ट्रेनिंग मध्ये जे तांत्रिक प्रशिक्षण आहेत त्यासंबंधीचे सर्व ट्रेड चे संपूर्ण प्रात्यक्षिक होणार असून सर्व ट्रेनिंग मध्ये उद्योजकीय मार्गदर्शन, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापकीय आणि कायदेशीर माहिती, मार्केटिंग कौशल्य, ग्राहकाशी संबंध, तयार करून बाजारात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र, विविध शासकीय योजना, बँकिंग ,प्रकल्प अहवाल ,उद्योगात लागणारे कागदपत्रे ,उद्योजकीय मानसिकता ,उद्योजकीय गुणसंपदा, इत्यादी विषयावर तज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय उभारणीसाठी एमसीडीमार्फत पाठपुरावा केला जाणार असून, प्रशिक्षणानंतरही प्रशिक्षणार्थींना मोफत मार्गदर्शन एमसीडी मार्फत मिळणार आहे .अमृतलक्षित गटातील किमान आठवी पास, कोणत्याही शासकीय कागदपत्रावर जातीचा उल्लेख असलेला तहसीलदार यांचा रहिवासी, आणि उत्पन्नाचा दाखला इत्यादी ,असणारे सर्व अमृतलक्षित गटातील इच्छुक अर्ज करू शकतात, यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी,  जिल्हा उद्योग केंद्र आवर ,फुलोरा हॉटेल जवळ सातारा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत , अमृतलक्षित  गटातील पात्र लाभार्थींची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड होणार आहे, इच्छुक प्रशिक्षणार्थी यांनी सदर योजनेचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती सांगावी असे आव्हान महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सातारा च्या प्रकल्प अधिकारी सौ शीतल पाटील (8788190189)व अमृत संस्थेचे सातारा जिल्हा व्यवस्थापक श्री. विनायक पाठकजी(9923197206 )यांनी आव्हान केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!