Thu, Jan 15, 2026
शिक्षण

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न
Ashok Ithape
  • PublishedAugust 6, 2025

प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील

रत्नागिरी : भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्माननाने जगण्याचा अधिकारी आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचीव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. ते सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थी, शिक्षक यांचेसाठी आयोजित बाल-अनुकुल कायदेशीर सेवा योजना २०२४, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा, समाजातील महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता व जन-जागृती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.श्री पाटील पुढे म्हणाले, समाजात कायदे विषयक जागृती निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. शिवाय समाजातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. विशेषतः बालक, स्त्रीया व वृद्ध हे अन्यायाला अधिक बळी पडत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी सरकाराने कडक कायदे केले आहेत.

यावेळी ॲड. अमित शिरगावकर यांनीही पोक्सो संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर यांनी व कोमसापचे श्री अरुण मोर्ये यांनी श्री पाटील व श्री शिरगावकर यांचे शाल, श्रीफळ, बुके व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक श्री कोळेकर यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवाशक्ती प्रमुख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे कायदा साथी अरुण मोर्ये यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.यावेळी दक्षिण कोकण विभागाचे श्री. कारंडे
लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच माधव अंकलगे सर तसेच इरा इंग्लिश स्कुलचे, दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे विधार्थी व शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. धनश्री बळकटे व श्री विनोद पेढे यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!