Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग

वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग
Ashok Ithape
  • PublishedJuly 31, 2025

रत्नागिरी l या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न होणारे असावेत एवढाच आमचा आग्रह आहे. सुदैवाने या भूमीतील आमदार आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असल्याने कधी नव्हे तो ‘योग’ आता जुळून आला आहे.. असा ‘योग’आजवर कधीच जुळून आला नव्हता म्हणूनच आलेली संधी वाया घालवू नये, प्रदुषण विरहीत प्रकल्पांचा मार्ग खुला करावा आणि या भूमीचा विकास देखील झपाट्याने मार्गी लागावा यासाठी वाटद पंचक्रोशीत येणाऱ्या प्रकल्पांचे आम्ही सारेजण जाहीर समर्थन करीत आहोत असे खणखणीत प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वाटद खंडाळा परिसरातील एक ज्येष्ठ उद्योजक श्री. बाळशेठ जोग यांनी प्रकल्प जनजागृती कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले, जग विलक्षण वेगाने औद्योगिक प्रगती करीत आहे आणि आपण मात्र जुनाट कालबाह्य कल्पना कवटाळून बसलो तर मग स्पर्धेत आपल्या देशाला व आपल्यालाही टिकाव धरणे कदापि शाक्य होणार नाही. म्हणूनच या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांची जनप्रबोधन सभा नुकतीच खंडाळा येथे झाली. या सभेमध्ये आपले रोखठोक मत मांडताना ज्येष्ठ नेते आणि उद्योजक बाळशेठ जोग. सोबत व्यासपीठावर ना.उदय सामंत आणि अन्य मान्यवर होते.

पुढे बोलताना त्यांनी सडेतोडपणे सांगितले की वाटद पंचक्रोशीत येऊ घातलेल्या प्रकल्पांना आमचा पूर्ण पाठींबा व सहकार्य राहील.

प्रकल्पाला पूर्ण पाठींबा !

तरुणांसाठी ट्रेनिंग केंद्रे ही मागणी देखील मान्य झाली
श्री. बाळशेठ बोग हे दूरदृष्टी असणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, “या प्रकल्पांसोबतच ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन वाटद, खंडाळा परिसरात सैनिकी शाळा सुरु करावी. येथील संस्थेकडे जागा आहे, शासनाने त्यासाठी मंजुरी द्यावी. तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी येणाऱ्या उद्योगांनी येथे तरुणांसाठी ट्रेनिंग सेंटर्स सुरु करावीत अशी आम्ही मागणी केली होती. ना. उदय सामंत यांनी ती तात्काळ मान्य केली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

अर्थव्यवस्था बळकट होईल

त्यांनी पुढे सांगितले, “प्रदुषण न करणारे आणि येथील उद्योग व्यवसायाला पुरक ठरणारे प्रकल्प अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. याच भूमिकेतून आम्ही सारेजण वाटद परिसरात होणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मिती व अन्य प्रकल्पांना जाहीर पांठींबा देत प्रकल्पांचे आपण खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. फक्त हे प्रकल्प प्रदुषणकारी नसावेत एवढीच आमची मागणी होती आणि ती ना. उदय सामंत यांनी त्वरित मान्य केली त्यामुळे या प्रकल्पात नाव ठेवण्याजोगे काहीच नाही. आमचा प्रकल्पाला पूर्ण पाठींबा आहे” असे त्यांनी सडेतोड शब्दात सांगितले. आहोत. हे प्रकल्प १०० टक्के प्रदुषण नसणारे आहेत. खुद्द उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी तशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना आम्ही वाटद येथे झालेल्या जन प्रबोधन सभेत व्यासपीठावरुन जाहीर समर्थन दिले” अशा स्वच्छ व स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका विषद केली.सर्व मागण्या मान्य श्री. बाळशेठ जोग हे आधुनिक व सुधारणावादी विचारांचे पाईक सांगितले, आम्ही जाहीर पाठींबा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढे देताना काही अटी घातल्या होत्या, त्या सर्व मान्य असल्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे समर्थन

प्रकल्प ठराविक काळात पूर्ण करण्याची ग्वाही !

या साऱ्या परिसरात येणारे उद्योग हे प्रदुषण विरहीत असतील अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली आहेच आणि उद्योग देखील ना, प्रदुषण न करणारे आहेत याचे आम्हाला समाधान आहे. मात्र हे प्रकल्प उभारण्यासाठी निश्चित असा कालावधी ठरविण्यात यावा अशी आमची मागणी होती. ती देखील हे प्रकल्प ठराविक काळातच उभे उदय सामंत यांनी मान्य केली. राहतील कारण कालावधी लांबला तर त्या उद्योग समूहांना ते परवडणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ती मागणी मान्य झाली आहे. प्रकल्पाखाली राहती भरे, सुपिक शेतजमीन, बागायती जमीन, नैसर्गिक जलस्त्रोत (पाणवठे) मंदिर, मस्जिद वा कोणतेही धार्मिक स्थळ नसावे या आमच्या मागण्या ना. उदय सामंत यांनी तात्काळ मान्य केल्या. आमच्या मागण्या मान्य झाल्याने आम्हा सर्वांचे पूर्ण समाधान झाले आहे” असे सडेतोड प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकल्पांचे स्वागत करुया।

श्री. बाळशेठ जोग भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, “आज कोकणचा विचार केला तर कोकण भकास होत चालले की काय? अशी भीती वाटू लागली आहे. बहुतांशी तरुण रोजी रोटीसाठी मुंबई वा अन्य बड्या शहरात गेल्याने येथील घरांम ध्ये फक्त वृध्द मंडळी असतात. जवळपास ६० टक्के तर काही ठिकाणी ९० टक्के घरे बंद आहेत. आता तर ही तरुण मंडळी आपल्या सोबत कुटुंब घेऊन गेल्याने येथील लोकसंख्या रोडावल्याचे चिन्न दिसून येते. त्यामुळे परिसराची ‘बरकत’ आटली की काय? असे वाटू लागते.. हे बदलायचे असेल तर येथे उद्योग आलेच पाहिजेत.. याच भावनेने येणाऱ्या प्रदुषण विरहित प्रकल्पांचे आपण सर्वांनी सुहास्य वदनाने स्वागत करायचे आहे असे

निःसंदीग्ध प्रतिपादन त्यांनी केले, सर्वाधिक दर मिळणार!
श्री. बाळशेठ जोग यांनी पुढे सांगितले, “मेथील जमिनींना भरघोस मोबदला मिळावा अशी सर्वांची मनोभावना आहे. उद्योगमंत्री हे सुदैवाने आपले आहेत, या मतदार संघाचे आम दार आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ सांगितले की जमिनींना सर्वाधिक दर दिला जाईल. लवकरच दर जाहीर होईल आणि मग मी खात्री देतो की सारे ग्रामस्थ मनोमन सुखावतील. अशा स्थितीत या प्रकल्पाला विरोध कशासाठी करायचा? असे उत्तम इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प येत असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सुसज्ज स्टेडियमची मागणी वाटद, गडनरळ, कोळीसरे, वैद्यलावगण, निरवणे, कळझोंडी परिसरात ‘मल्टीस्पेशालिटी’ सुसज्ज हॉस्पिटल व्हावे व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुसज्ज स्टेडियम व्हावे अशी मागणी आम्ही ना. उदय सामंत यांना व रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देकन केली आहे कायान ना. उदय सामंत यांनी अनुकूलता दर्शविली असून तशी योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत त्याबद्दल आम्ही सारेजण त्यांचे आभारी आहोत.

त्यांचे आपण सर्वांनी स्वागत करूं या आणि हो भूमी सुकलाम, सुफलाम झाल्याचे पाहण्याचे भाग्य आपणा सर्वांना याच पिढीला मिळो अशीच आम्हा सर्वांची सदभावना आहे” अशी मनोभावना त्यांनी व्यक्त केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!