Thu, Jan 15, 2026
शिक्षण

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार
Ashok Ithape
  • PublishedJuly 31, 2025

सातारा दि.30 :  फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सामाजिक दायित्वाच्या भावनेतून  अंगणवाडीच्या बालकांच्या सकस व पोष्टिक  आहार देण्यासाठी ग्रामस्थ  स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांच्या दायित्वातून बालकांना सकस व पौष्टीक आहार मिळत आहे. या  उपक्रमाचा शुभारंभ फलटणच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलबाबा नगर व धुळदेव येथे करण्यात आला.

शुभारंभ प्रसंगी   धुळदेव देवस्थान ट्रस्ट चेअरमन दत्तात्रय भिवरकर, बापूराव भिवारकर, महादेव चोरमले, संदीप सरक, सरपंच मनीषा पवार, व्यंकटराव दडस आदी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत शेंगदाणा, गुळ लाडू, खजूर, केळी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की काही ठिकाणी तर अगदी काजू , बदामही नागरिकांनी अंगणवाडतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी दिले.
आमची मुलं घरी असे पौष्टिक पदार्थ खात नाहीत, मात्र अंगणवाडीमध्ये एकमेकांच्या संगतीने अगदी आनंदात पौष्टिक आहार  फस्त करतात अशा भावनाही पालकांनी व्यक्त केल्या.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार दिला जातो. नागरिकांनी आपले सामाजिक दायित्व समजून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार द्यावे, असे आवाहनही बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी केले आहे.

प्रकाश मोरे, सचिन नाळे , अक्षय सोनवणे, सतीश ठोंबरे, हरी पवार व दत्तू खरात यांनी अंगणवाडीसाठी  पौष्टिक आहार उपलब्ध करुन दिला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!