वाईच्या इनरव्हील क्लबमध्ये नेतृत्वाचा नवा अध्याय;
![]()
२०२५-२६ साठी पदाधिकाऱ्यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा होणार संपन्न
वाई, २६ जुलै २०२५: इनरव्हील क्लब ऑफ वाईच्या २०२५-२६ वर्षासाठीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल श्री यश, वाई येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची टीम पदभार स्वीकारणार असून, त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पी.डी.सी. रोहिणी वैद्य उपस्थित राहणार आहेत, डिस्ट्रिक्ट एडिटर स्वाती बिरामणे सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.
इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला संघटना आहे, ही संस्था जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, मैत्री, सेवा आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारपणा या तीन मुख्य उद्दिष्टांवर आधारित आहे. इनरव्हील सदस्य स्वयंसेवक म्हणून काम करतात आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध सामाजिक आणि सेवाभावी कार्य करतात. इनरव्हील क्लब ही एक सक्रिय आणि समर्पित संस्था आहे जी विविध सामाजिक कार्यांद्वारे समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. त्यांचे कार्य आरोग्य, शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल घडवते.
२०२५-२६ वर्षासाठीचे नवनियुक्त पदाधिकारी:
• अध्यक्षा: श्रीमती रूपाली मोरे,
• उपाध्यक्ष श्रीमती रेखा चिरगुटे
• सचिव: श्रीमती पिंकी जैन
• कोषाध्यक्ष: श्रीमती तेजल सावंत
• संपादक: श्रीमती शितल थोपटे,
• ट्रेझरर श्रीमती तेजल सावंत
• आय.एस.ओ.: श्रीमती संयुक्ता देवकुळे
• सी.पी. उपाध्यक्ष: श्रीमती सुनंदा कासुर्डे
• केंद्रीय आयुक्त: श्रीमती रेखा चिरगुटे
• सी पि सी सी श्रीमती वर्षा भोसले
या समारंभासाठी इनरव्हील क्लब ऑफ वाईच्या २०२४-२५ च्या अध्यक्षा श्रीमती रूपाली मोरे आणि सचिव श्रीमती पिंकी जैन यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन केले आहे.













