Mon, Mar 2, 2026
नोकरी मार्गदर्शन

कराड येथे 22 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

कराड येथे 22 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJuly 17, 2025

सातारा दि. 17 :  जागतिक युवा कौशल्य सप्ताहानिमित्त सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 22 जुलै रोजी   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व शिक्षण मंडळ, कराड संचालितक महिला महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालय, कराड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर,  कुशल व अर्धकुशल कामगार अशा  प्रकारचे 1500 जास्त रिक्तपदे  https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.  तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 22 जुलै रोजी  आपले शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!