Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

वाई मांढरदेव रस्त्याची दयनीय अवस्था

वाई मांढरदेव रस्त्याची दयनीय अवस्था
Ashok Ithape
  • PublishedJuly 2, 2025

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच लोकांना समजेना?

वाई प्रतिनिधी l प्रथमेश भांडवलकर : सतत पडणाऱ्या पावसामुळे गेले काही दिवस वाई मांढरदेव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साठून रस्त्याचे तीन तेरा वाजलेले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे.

या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात देखील होत आहेत. तसेच या मार्गादरम्यान  एमआयडीसी प्रकल्पातील वाहतूक सुरू असते. मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत असल्याने या रस्त्यावरून गाडी चालवणे फार कठीण झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणावर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मांढरदेवी हे दक्षिण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ असून, दरवर्षी दर्शनासाठी हजारो भाविक येतात पण त्यांची यात्रा ही खराब रस्त्यामुळे संकटमय बनत आहे. तसेच स्थानिक नागरिक, गावकरी, शेतकरी, शाळकरी मुले, सर्वसामान्य नागरिक, व याच रस्त्याने कामासाठी प्रवास करणारे कर्मचारी यांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. व रस्त्यावर साठणाऱ्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होत आहे.

वाई मांढरदेव मार्ग केवळ रस्ता नाही तर तो धार्मिक पर्यटन स्थानिक रोजगार व औद्योगिक विकासाचा मुख्य दुवा आहे याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रभावीशाली पावले उचलावी अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!