Thu, Jan 15, 2026
आरोग्य

जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांचे मोफत टू डी इको तपासणी

जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांचे मोफत टू डी इको तपासणी
Ashok Ithape
  • PublishedJune 28, 2025

सातारा दि. 27:  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांचे मोफत टू डी इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या पैकी हदय शस्रक्रियासाठी 23 बालके पात्र झाली आहेत. या पात्र झालेल्या बालकांच्या हृदय शस्रक्रिया ज्युपिटर हॉस्पीटल, पुणे येथे मोफत करण्यात येणार आहेत.

या शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यकित्सक डॉ. मेजर राहूलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुभाष कदम, बालरोग तज्ञ डॉ. उल्का झेंडे, वैदयकिय महाविद्यालयातील डॉ. कुलकणी व डॉ. निघोट, ज्युपिटर हॉस्पीटल येथील तज्ञ डॉ. अभिजीत नाईक, डॉ. राहूल सराफ, आरबीएसके विभाग व डीईआयसी विभागामधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराचे आयोजन अंगणवाडी व शाळा तपासणी दरम्यान आढळलेल्या संशयति हृदयरुग्ण बालकांची मोफत टु डी इको तपासणी करण्यात आली. सदरचे शिबिर ज्युपिटर हॉस्पीटल, पुणे व जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडले. या शिबिरामध्ये एकुण 115 बालकांची हदयरोग तपासणी करण्यात आली.

आरबीएसके कार्यक्रम ही शासनाची अतिशय महत्वाची योजना असुन निरोगी व सशक्त बालके हेच उद्याचे भविष्य आहे.  या समाजातील लहान मुले पुढील पिढीचे दिपक आहेत. यामुळे या बालकांच्या आरोग्या बाबत जागरुक राहून या योजनेचा लाभ घेणेबाबत आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी  करुन जिल्हा रुग्णालयाने केलेल्या कामाबाबत गौरवोदगार काढले.

ग्रामीण भागातील बालकांसाठी उच्च प्रतीच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या सोयीसुविधा व उपचाराबाबत वेळोवेळी आरबीएसके पथक मार्गदर्शन करीत असते. सदरची आरबीएसके पथके अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन आरोग्य विषयाबाबतचे महत्व पटवून देतात. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत अशी विविध शिबिरे वारंवार घेऊन विद्यार्थी व बालके निरोगी कसे रहावेत या बाबत काळजी घेतली जाते. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील तळागळातील लाभार्थी बालकांना खाजगी हॉस्पीटल सारख्या सोयीसुविधा आरबीएसके व डीईआयसी विभाग यांच्या मार्फत दिल्या जातात. या विभागा मार्फत सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी जिल्ह्यातील उत्तम प्रतिच्या आरोग्य सोयीसुविधा पुरवण्याबाबत व कोणताही बालक या उपचारापासुन वंचित राहणार नाही याची खात्री दिली.  डॉ. उल्का झेंडे बालरोग तज्ञ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व्यंकटेश गौर यांनी केले व डॉ. स्मिता देशमुख यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!