Thu, Jan 15, 2026
क्राईम न्यूज

“ऑपरेशन अल्केमिस्ट” मध्ये डीआरआयने तस्करीचे सोने वितळवणारा प्रमुख कारखाना उघडकीस आणला

“ऑपरेशन अल्केमिस्ट” मध्ये डीआरआयने तस्करीचे सोने वितळवणारा प्रमुख कारखाना उघडकीस आणला
Ashok Ithape
  • PublishedJune 24, 2025

मुंबई, 23 जून 2025

“ऑपरेशन अल्केमिस्ट” या सांकेतिक नावाने रात्रीच्या वेळी  काटेकोरपणे राबवलेल्या मोहिमेत , महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागीय युनिटने एका संघटित टोळीद्वारे भरती करण्यात आलेल्या वाहक प्रवाशांद्वारे दुबईहून भारतात तस्करी करून आणलेले सोने  वितळवण्याच्या  प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका मोठ्या अवैध  गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा  पर्दाफाश केला.

या कारवाईदरम्यान, सोने  वितळवण्याचे काम सुरु असलेल्या या  कारखान्यातून  बाहेर पडणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या ताब्यातून बार स्वरूपात 8.74 किलो सोने जप्त करण्यात आले. या कारखान्याचा  तात्काळ शोध घेतल्यामुळे  तस्करी केलेल्या सोन्याचे बारमध्ये रूपांतर करण्यात सक्रिय असलेल्या दोन ऑपरेटरना अटक करण्यात यश आले.

तपासात असे दिसून आले की त्याच दिवशी मुंबईतील सीएसएमआय विमानतळावरून भारतात सोने असलेल्या  18 अंड्याच्या आकाराच्या  कॅप्सूलची भारतात तस्करी करण्यात आली होती. या कॅप्सूल कारखान्यात वितळवून सहा बारमध्ये रूपांतरित करण्यात आल्या, ज्यांचे एकूण वजन 8.74 किलो होते.

पाठपुराव्यादाखल केलेल्या कारवाईत तस्करी केलेल्या कॅप्सूल गोळा करण्यात सहभागी असलेल्या आणखी दोन व्यक्तींना आणि वितळवण्याच्या कामांचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रमुख व्यक्तीला अटक करण्यात आली.

एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेले सोने, ज्याची किंमत 8.93 कोटी रुपये आहे, ते सीमाशुल्क कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले आहे आणि सर्व सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या यशस्वी  मोहिमेतून सोन्याच्या तस्करीला रोखण्याचा आणि भारताच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्याचा डीआरआयचा  निरंतर  दृढनिश्चय  अधोरेखित होतो. कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि तस्कर आणि त्यांच्या गुन्हेगारांविरुद्ध सतर्क अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!