Mon, Mar 2, 2026
सामाजिक

पंचवक्त्र संस्थेमार्फत वाई महाबळेश्वर मध्ये सुर झाली सामाजिक बदलाची शाश्वत दिशा.

पंचवक्त्र संस्थेमार्फत वाई महाबळेश्वर मध्ये सुर झाली सामाजिक बदलाची शाश्वत दिशा.
Ashok Ithape
  • PublishedJune 23, 2025

गावातील शाळांमध्ये मुलांना रचनावाद पद्धतीमधून शिक्षण मिळावे हा उद्देश मनाशी बाळगून पंचवक्त्र संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे.

वाई प्रतिनिधी l प्रथमेश भांडवलकर : पंचवक्तत्र संस्थेमार्फत वाई व महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. समाजामध्ये एक परिवर्तनात्मक बदल व्हावा यासाठी पंचवक्त्र संस्था ही शिक्षण, सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. समाजामधील गरजू व वंचित लोकांचा सर्वांगीण विकास करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. पंचवक्त्र संस्थेमार्फत 2012 मध्ये विकास घर हा उपक्रम सुरू करण्यात आला. गावातील शाळांमध्ये मुलांना रचनावादी पद्धतीमधून शिक्षण मिळावे हा उद्देश मनाशी बाळगून पंचवक्त्र संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. तसेच रचनावादी शिक्षण पद्धतीमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे. व त्याचा फायदा मुलांना व पालकांना देखील होत आहे.

शिक्षण क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रात देखील सर्वसामान्य लोकांसाठी पंचवक्त्र संस्थेने वाई शेंदुर्जन येथे गोपाळकृष्ण चिकित्सालय उभारलेले आहे. या चिकित्सालायामुळे सर्वसामान्य लोकांना अल्प खर्चामध्ये नेत्र संदर्भातील आजारांवर उपाय होत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर त्या भागातील तरुणांनी एकत्र येऊन आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आपला उदरनिर्वाह करून काम करावे यासाठी तसेच समाजामध्ये जनजागृती आणावी यासाठी पंचवक्त्र संस्थेने 2024 मध्ये संभाव्य फेलो लीडरशिप सुरू केली. ह्या फेलोशिप मधून अनेक भागातील गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फेलों मार्फत काम चालू आहे. प्रामुख्याने पाचवड, अमृतवाडी, भुईंज या गावांमध्ये पंचवक्त्र संस्थेमार्फत फेलो काम करतात. या भागातील ज्या गोपाळ वस्ती आहेत. त्या वस्तीमध्ये जाऊन ते तेथील लोकांशी एक चांगले संबंध तयार करून त्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव, शिक्षणाविषयी प्रेम, व आपल्यालाही सन्मानाने या समाजात जगण्याचा अधिकार आहे. यासाठी वस्तीमध्ये जाऊन तेथील वस्तीतील मुलांना शिकवणे. त्या मुलांना शिक्षणाप्रती आवड निर्माण करणे. तेथील वस्तीतील लोकांमध्ये स्वच्छता, शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्त्री पुरुष समानता, बालविवाह, या विषयावर जनजागृती करण्याचे काम फेलो करत आहेत.

गावांमध्ये सकारात्मक बदल व्हावा हाच दृष्टिकोन संस्थेचा आहे व तो सत्यात उतरवण्यासाठी पंचवक्त्र संस्थेमधील फेलो स्नेहल राजपुरे ह्या युवतीने आपल्या कणूर गावामध्ये समस्या शोधून, पंचवक्त्र संस्थेच्या प्रकल्प अधिकारी सौ.पूजा पांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प यशस्वी केला. सुरुवातीला कणूर गावामध्ये काम करत असताना. फेलो स्नेहल हिला गावामध्ये अनेक अडचणी आल्या. गावांमधील लोकांशी तिने संवाद साधला . गावातील अडचणी जाणून घेतल्या व तेव्हा तिला समजले की गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. गावामध्ये कचऱ्यामुळे वाढणारे आजार,दुर्गंधी अस्वच्छता, यांसारख्या समस्या तिला आढळून आल्या व ह्या समस्यावर काम करायचे असे संस्थेने ठरवले. समाजामध्ये व आपल्या गावामध्ये बदल घडवण्याच्या हेतू मनाशी बाळगून स्नेहलने संस्थेच्या मदतीने लोकांच्या मनामध्ये कचरा व्यवस्थापन विषयी जनजागृती निर्माण केली.  पंचवत्र संस्था व वाई रोटरी क्लब यांच्या मदतीने कणूर गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनेसाठी ड्रम्स नागरिकांना देण्यात आले . या प्रकल्पामध्ये कनूर गावातील महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आला.

या उपक्रमामुळे गावातील लोकांना गावाच्या विकासाच्या दृष्टीने फायदा तर होतच आहे. असे तेथील स्थानिक लोकांचे मत आहे. पंचवक्त्र संस्थेच्या व गावाच्या निश्चयामुळे घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प कणूर गावामध्ये यशस्वी झाला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!