Thu, Jan 15, 2026
योजना

स्त्रोत बळकटीकरण व शाश्वती करणासाठी लोकसहभाग व प्लास्टिक व्यवस्थापन महत्वाचे ; प्रज्ञा माने – भोसले

स्त्रोत बळकटीकरण व शाश्वती करणासाठी लोकसहभाग व प्लास्टिक व्यवस्थापन महत्वाचे ; प्रज्ञा माने – भोसले
Ashok Ithape
  • PublishedJune 16, 2025

वाई : राज्यातील सर्वात महत्वकांक्षी योजना जलजीवन मिशन हे स्वच्छ भारत मिशन अभियान संपूर्ण राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणी परपठा योजनांकरता राज्य शासनाने गावातील पाणीपुरवठा व आरोग्य पोषण व स्वच्छता समिती मधील सदस्यांचे स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण करणे बाबत दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन श्री मनवेल बारदेसकर एज्यूकेशन सोसायटी गारगोटी व जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती वाई यांचे वतीने आयोजीत करण्यात आले आहे सदर प्रशिक्षणा साठी
वाई विकास गटामधील सर्व ग्रामपंचायत मधील सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्याप्रमाणे दिनांक 16 जून 2025 रोजी हॉटेल मिलन वाई तालुका वाई या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत मधील आयोजित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले मॅडम यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामपंचायतमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रतिदिन प्रति मानसी 55 लिटर प्रमाणे शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून प्रत्येक कुटुंबाला हरघर जल या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे गावांमध्ये उभारण्यात आलेल्या उपाय योजना हे शाश्वत स्वरूपात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच या उपाययोजनांची देखभाल दुरुस्ती करणे तसेच स्त्रोतांचे बळकटीकरण करण्याकरता मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच लोकसभागातून लोकवर्गणी गोळा करणे करिता प्रचार प्रसिद्धी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गावातील स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण घेण्यात आलेल्या नळ जलमित्र यांची निवड करण्यात आलेली असून त्यांच्या माध्यमातून योजनांची देखभाल दुरुस्ती करणे सोयीस्कर होईल त्याचप्रमाणे गावातील पिण्याच्या पाण्याची बचत आणि गुणवत्ता टिकून ठेवण्याकरिता पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पाण्याची गुणवत्ता तपासून गावातील लोकांचे आरोग्यमान उंचावण्याकरता योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. याच पद्धतीने गावातील महिलांचा मोठ्या संख्येने लोकसभा घेऊन पाणी बचती करता मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे कारण पाणी बचतीची सवय सर्वांमध्ये रुजवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण पाणी हे जीवन आहे त्या अनुषंगाने पाणी बचती करता विविध उपक्रम व उपाययोजना राबवणे हे गावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्याकरता गावातील सर्व घटकांनी परिपूर्ण आणि प्रामाणिकपणे पाणीबचती करिता आपले योगदान देणे फार महत्त्वाचे आहे.

शासनामार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गावातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा मिळणे करता मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करण्यात येत असून त्याचा सर्व ग्रामपंचायत यांना लाभ होणे महत्त्वाचे आहे असे सांगण्यात आले त्याचबरोबर ही योजना प्रभावीपणे राबवण्याकरीता स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात यावी.

वाई पंचायतसमिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी मार्गदर्शन करत असताना सर्व प्रशिक्षणार्थी यांना आवाहन केले की वाई तालुक्यांमध्ये दुष्काळी भागाप्रमाणे परिस्थिती उपलब्ध होऊ नये याकरिता पाण्याचा सुयोग्य वापर आणि वॉटर बजेट करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशन अंतर्गत गावामध्ये विविध कार्यक्रम तसेच उपायोजना या लोकसहभागाअंतर्गत राबवण्यात येणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील भूजलाची पातळी वाढवण्याकरता रेन वॉटर हार्वेस्टिंग, सार्वजनिक व वैयक्तिक शोषखड्डे बांधकाम करणे, रिचार्ज शाफ्ट, शेततळे बंधारे तसेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमी पाणी लागणारे पिकांची लागवड करणे या करिता गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व प्रशासन आपल्या करिता नेहमीच कार्यशील राहील असे आवाहन विजयकुमार परीट यांनी यावेळी केले.

पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा कक्षातील अजय राऊत, तालुका कक्षाचे रोहित जाधव, स्वाती जाधव, शुभांगी शेलार, ऋचा परमणे, तसेच मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी गारगोटी कोल्हापूर चे राज्य समन्वयक जयवंत पाटीलआणि सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, पाणीपुरवठा कर्मचारी, सी आर पी बचत गट, महिला प्रमुख उपस्थित होते

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!