तिर्थक्षेत्र भुईंज म्हणून उदयास येण्यासाठी सदगुरू नारायण महाराजांनी दिलेले योगदान व केलेली तपस्या जपून ठेवा ; यशवंत कुलकर्णी
भुईज : तिर्थक्षेत्र भुईंज म्हणून उदयास येण्यासाठी सदगुरू नारायण महाराजांनी दिलेले योगदान व केलेली तपस्या जपून ठेवा यावरच हे कृष्णाकाठचे अद्यात्मिक संस्कार केंद भविष्याला खूप काही शिकवेल याची जवाबदारी सर्व ग्रामस्थांच्यासहीत सेवेकरी यांनी घ्यावी असे प्रतिपादन यशवंत कुलकर्णी यांनी यावेळी केले.
भुईंज ता. वाई येथे विश्व चैतन्य सदगुरू नारायण महाराज मासीक स्मृती व्याख्यानमालेत पुणे येथील उद्योगपती सतशिष्य यशवंत कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मैय्यासाहेब जाधवराव तर प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच अर्जुननाना भोसले विजय क्षीरसागर होते.
यावेळी बोलताना यशवंत कुलकर्णी पुढे म्हणाले की, सदगुरू नारायण महाराजांनी चार दशकापासून भुईंज येथे आचार्य भृगुमहर्षिच्या या तपोभूमित केलेली तपश्चर्या व संशोधन हे मानवजातीला नवसंजीवनी देणारे ठरले याही पेक्षा आम्हा शिष्य व सेवेकरी यांना ऋशीमहर्षिची परंपरा, शिकवण अनुभवाला मिळाली. इथली भूमी व कृष्णानदी सद्गुरूंच्या संकल्पनेतील तिर्थक्षेत्र भुईज म्हणूनच विकसीत झाले आहे वाचे पावित्र्य व मांगल्य जपण्याची आपली जवाबदारी आहे असे ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत जेष्ठ सेवेकरी प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी केले तर प्रास्ताविक माजी सरपंच अर्जुननाना भोसले यांनी केले भय्यासाहेब जाधवराव यांनी उपस्थितांचे आभार मानले सुत्र संचालन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास जाधव यांनी केले कार्यक्रमास भुईंज आणि परिसरातील सेवेकरी, शिष्यगण, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे संयोजन दत्तसेवेकरी मंडळ, आचार्य भृगुऋषी आश्रम सेवेकरी, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, सदगुरू आण्णांच्या लेकी ग्रुप, प्रेस क्लब भुईंज, जेष्ठ नागरिक संघ यांच्या सामुदायिक सहकार्यातून केले जाते.
फोटो ओळी : किश्च चैतन्य सदगुरु नारायण महाराज मासिक स्मृती व्याख्यानमाले प्रसंगी भाविक भक्तगण यशवंत कुलकर्णी, विजय क्षीरसागर













