संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी साठी बावधनची माऊली व सोन्या बैल जोडी मानकरी
वाई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा श्री विठ्ठल रखुमाई जून महिन्यात पंढरीच्या या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी पायी वारी पालखी दिंडी सोहळा निघतो त्याच प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत सोपान काका महाराज संत निवृत्ती महाराज आदींच्या पालखीतून पादुका विठुरायाच्या भेटीसाठी निघतात अशा पालखी साठी नामांकित जातिवंत खिलार बैलांची निवड करून मान दिला.
2025 यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी साठी बावधन मधील गणपत सखाराम कदम यांच्या प्रधान व राजा बैल जोडीला मान मिळाला त्याचप्रमाणे 2025 यंदाच संत निवृत्तीनाथ महाराज पालखी साठी बावधन मधील बाळासाहेब गणपत कदम परिवाराला पुन्हा पालखी साठी माऊली व सोन्या बैल जोडीला हा बहुमान मिळाला आहे गणा बापू व बाळू चेअरमन यांची बैले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीला आळंदी ते पंढरपूर व संत निवृत्ती महाराज यांच्या पालखीला त्रंबकेश्वर ते पंढरपूर असा प्रवास करून आषाढी एकादशी पंढरपूर मध्ये दाखल होतील.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर साधू संतांची तपोभूमी मानली जाते अशा पावन भूमीतील सचिन शिखरे व श्रीवर्धन शिखरे यांनी माऊली व सोन्या बैल जोडी खरेदी केली असून या बैल जोडीला संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या पालखी ओढण्याचा मान मिळाला आहे बावधन येथील माऊली व सोन्या बैल जोडी चे पूजन औक्षण कार्यक्रम कदम परिवाराने आयोजित केला होता बैल जोडी चे पूजन सौ संगीता कदम माया कदम स्मिता कदम रागिनी कदम दिपाली कदम यांनी केले पाहुण्यांचा सत्कार संजय कदम शेखर कदम बाळासाहेब कदम आप्पा कदम चेतन पिसाळ यांनी केला प्रस्ताविक भाषण सुनील तात्या कदम यांनी केले सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले.
मालक सचिन शिखरे बोलताना म्हणाले महाराष्ट्रात बावधन ची खिल्लार जातिवंत बैले प्रसिद्ध आहेत हे नाव ऐकून आम्ही बावधन ची कदम यांची माऊली व सोन्या बैलजोडी पसंत केली संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यासाठी माऊली व सोन्याची निवड झाल्याने शिखरे व कदम परिवार आनंदी आहे.
कार्यक्रमास माजी उपसभापती मदन भोसले उपसरपंच उदय श्री पिसाळ पप्पू भडांगे प्रवीण गोवाडे गोविंद इथापे दिलीप मांढरे दत्तात्रय शिंदे ऍड दिग्विजय ठोंबरे बाळासाहेब कांबळे अजित पिसाळ दिगंबर पिसाळ किसन भोसले प्रशांत पिसाळ सोन्या ननावरे मनोज भिलारे बंडू नायकवडी सुशील पिसाळ उमेश भोसले सुदाम भोसले प्रकाश मांढरे शिवाजी राऊत किरण झांजुर्णे दशरथ ठोंबरे ऋषिकेश भोसले आदी बैलप्रेमी उपस्थित होते.
दिलीप कांबळे, बावधन













