कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे
वाई : सध्या खरीप हंगामाची तयारी जोरात सुरु आहे. त्या अनुषंगाने कृषि विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी वाई श्री प्रशांत शेंडे यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग , आत्मा व आय जी एल अग्रीकॉन फर्टीलायजर्स यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी श्री शेंडे यांनी कृषि विभागाच्या सुरु असलेल्या बियाणे उगवण क्षमता, बिजप्रक्रिया, शंखी गोगलगाय नियंत्रण मोहीम तसेच फळबाग लागवड, महा डी बी टी पोर्टल वरील योजना, यासारख्या विविध अनुदानच्या योजनाची सखोल माहिती दिली. जास्तीत जास्त शेतकरी यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा व विविध अनुदानाच्या योजना साठी अर्ज करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्री नितीन शिंदे यांनी हळद उत्पादन लागवड तंत्रज्ञान विषयी सखोल माहिती दिली. तसेच आय जी एल व अग्रीकॉन कंपनी च्या विविध उत्पादनाची माहिती दिली.
तंत्र अधिकारी श्री तेजदीप ढगे यांनी यावेळी कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता वापर याविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. श्री निखिल मोरे उप कृषि अधिकारी यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री रवींद्र बेलदार मंडळ कृषि अधिकारी यांनी आभार मानले. यावेळी श्री शांताराम गोळे कृषि अधिकारी पंचायत समिती, प्रदीप देवरे बीटीएम,आत्मा सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती भाग्यश्री कदम, योगेश जयकर, एटीएम आत्मा, व आय जी एल कंपनी चे श्री सुनील निकत, प्रतीक शिर्के, तेजस गुलूंबकर, वाई मंडळ मधील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, सयाजी पिसाळ, अतुल भोसले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













