धोम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शाळेप्रती कृतज्ञता.
![]()
वरखडवाडी येथील देशमुख फार्म मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
वाई l प्रतिनिधी : वाई तालुक्यातील धोम येथील उपक्रमशील शाळा नरसिंह हायस्कुल, धोम या विद्यालयाचे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 31 वर्षानंतर एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र-मैत्रिणींची भेट होतच त्यांना शाळेचे सारे जुने दिवस आठवले. आपणही आपल्या शाळेप्रती देणे लागतो या भावनेने या विद्यार्थ्याने शाळेची भेट घेतली.
1994-95 मध्ये दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच रविवार दिनांक 18 मे रोजी वरखडवाडी येथील देशमुख फार्मवर संपन्न झाला. सुरुवातीस काही विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. ग्रुप वर एकत्र येण्याच्या तसेच स्नेहसंमेलन घेण्याच्या चर्चा
सुरू झाल्या.
अखेर विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल 31 वर्षानंतर वरखडवाडी येथील देशमुख फार्मवर एकत्र आले. सविस्तर चर्चा केली. तदनंतर सर्वांनी शाळेला भेट दिली. बोरीव येथील बोटिंग क्लब मध्ये जाऊन मन मुराद नौका विहाराचा आनंद घेतला. शाळेत असताना केलेल्या गमती जमती, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.
विद्यालय परिसरात विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकाना आपले शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. यापुढेही असेच एकत्र येऊन स्नेहमेळावा घ्यायचे तसेच विद्यालयात विद्यालयास सहकार्य करायचे असेही सर्वानुमते ठरवण्यात आले.













