Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

‘भुईंज पोलीस स्टेशन’ चा पुणे विभागात द्वितीय क्रमांक

‘भुईंज पोलीस स्टेशन’ चा पुणे विभागात द्वितीय क्रमांक
Ashok Ithape
  • PublishedMay 18, 2025

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी  ‘रमेश गर्जे’  यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावला द्वितीय क्रमांक

भुईंज : महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवसांचे कार्यलयीन सुधारणांची विशेष मोहिमेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट कार्यलय म्हणून भुईंज पोलीस स्टेशन ने द्वितीय क्रमांक पटकावला.

दरम्यान भुईंज पोलीस स्टेशन चा कायापालट करणारे भुईंज पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात शासकीय कार्यलये व त्यांच्या सुविधा यांच्यात सुधारणा होऊन सर्वसामान्य जनतेला गतिमान सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष मोहीम राबवली. यातील दुसऱ्या टप्प्यातील निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये भुईंज पोलीस स्टेशनला पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात द्वितीय क्रमांक देण्यात आला, या जाहीर झालेल्या निकलानंतर भुईंज चे प्रभारी अधिकारी रमेश गर्जे व त्यांचे सहकारी अंमलदार, हवालदार, बीट अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखा, वाहतूक शाखा, गोपनीय कक्ष या सर्वांना भुईंज ग्रामस्थांनी व परिसरातील विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील विविध पक्ष्यांचे नेते पदाधिकारी यांनी अभिनंदन करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रमेश गर्जे यांनी दोन वर्षांपूर्वी भुईंज पोलीस स्टेशनचा कारभार हातामध्ये घेतला. त्यानंतर सर्व पोलीस स्टेशनला रंग रंगोटी, दुय्यम दोन्हीही अधिकारी यांना बसण्यासाठी दोन सर्व सुविधायुक्त केबिनरुम, महिला वर्गासाठी वेगळी केबिन, मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक, सर्व स्टाफ व येणाऱ्या सर्वांसाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंगची व्यवस्था अद्यावत करून भुईंज पोलीस स्टेशनचा चेहरा मोहराच बदलून टाकला.

त्यांनी केलेला कार्यकुशल आणि कर्तव्यदक्ष पणामुळेच हे शक्य झाले आसुन पुणे विभागात त्यांचा द्वितीय क्रमांक आला. तसे पाहिले तर पुणे विभागात चांगल्या प्रकारचे आणि अद्यावत असे हे पोलीस स्टेशन असून याला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी रमेश गर्जे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सर्व कामे करून घेतली त्यामुळेच हे शक्य झाले.

एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने जर प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्ष पणे काम केले तर ते कसे होते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भुईंज पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी रमेश गर्जेच होय…  यासर्वांचे श्रेय हे रमेश गर्जे यांनी आपल्या सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले आहे. या सर्व टीमवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!