विजयसिंह नायकवडी यांची दिशा समितीवर निवड
वाई. दि १४ :- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे वाई पंचायत समितीचे माजी सभापती श्री विजयसिंह नायकवडी यांची केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा या समितीच्या प्रशासकीय सदस्य पदी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली आहे.
श्री नायकवडी हे 1992 पासून दोन वेळा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांनी वाई पंचायत समितीमध्ये उपसभापती व सभापती म्हणून आपली कारकीर्द गाजवली आहे. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र शासनाच्या निर्मल ग्राम योजनेची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी करून तालुका निर्मल म्हणून पुरस्कारही प्राप्त केला होता.
ग्रामीण भागाशी त्यांची नाळ व अत्यंत आभासपूर्ण वक्तव्याने त्यांनी जनमानसातील प्रतिमा अत्यंत वेगळी आहे .या त्यांच्या निवडीमुळे निश्चितपणे वाई तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल .जि. प.शिक्षण समितीचे माजी सभापती सुनिल काटकर, युवा नेते संग्राम बर्गे, स्वीय सहाय्यक काका धुमाळ, भाजपाचे पदाधिकारी अविनाश फरांदे, वाई शहर भाजपाचे अध्यक्ष विजय ढेकाणे, प्रसाद सुर्वे, दत्ता मर्ढेकर, प्रदीप जायगुडे आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
फोटो खालील ओळी :- विजय नायकवडी यांना पेढा भरवुन अभिनंदन करताना खा.श्री.छत्रपती उदयनराजे भोसले व इतर.













