भुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज( विज्ञान ) चा निकाल 98.31 टक्के
![]()
दरवर्षीप्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत यावर्षी सुद्धा प्रथम तीन क्रमांक हे मुलींनीच मिळवले.
भुईंज : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (विज्ञान ) भुईंज चा निकाल 98.31 टक्के लागलेला असून दरवर्षीप्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटत यावर्षी सुद्धा प्रथम तीन क्रमांक हे मुलींनीच मिळवले असल्याने यांचे सर्वच स्थरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
भुईंज ता. वाई येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (विज्ञान)भुईंज एच. एस. सी. बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल हा ९८.३१ टक्के लागलेला असून या विद्यालयाने भरघोस असे यश संपादन केले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. श्रावणी संतोष वाघ हिने ६६.१७, दुसऱ्या क्रमांकावर कु. आदिती प्रशांत पवार हिने ६४.८३, तर तिसरा क्रमांक हा कु. स्नेहल हणमंत सूर्यवंशी हिने पटकावला असून तिला ६०.६७ टक्के मार्क मिळवून या तिघांनीहि भरघोस यश संपादन करून विद्यालयाचा नावलौकिकात भर टाकली.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व बाकी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्युनिअर विभाग प्रमुख – ए.एस.कांबळे,सीईटी विभाग प्रमुख एस. व्ही.नष्टे,डी.के झुराळे,पी.ए पाटील, के.आर पोतदार,ए.यू ओव्हाळ,एस.आर. गुरव,आर.बी सुर्यवंशी,एस,एस चव्हाण,पी.एच.कदम या प्राध्यापक व शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.भैय्यासाहेब जाधवराव- इनामदार, उत्तमराव भोसले, अशोक शिंदे,कॉलेजचे प्राचार्य मा.श्री.डी.एन. ढाणे , उपमुख्याध्यापक युसुफ शेख ,पर्यवेक्षक श्री.पतंगे एस.आर. तसेच भुईंज पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व विद्यालयावर प्रेम करणाऱ्या असंख्य मान्यवरांनी त्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.
भुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील जुनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख अनुजा कांबळे व त्यांच्या सर्व टीम मधील सहकारी शिक्षकांनी हे विद्यार्थी कसे घडतील आणि शाळेसह रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवतील याकडे प्रामाणिकपणे लक्ष देत अकरावी साठी फाउंडेशन बॅच तर बारावी साठी जेईई, सीईटी, व नीट परीक्षेसाठी ज्यादा मार्गदर्शन पर क्लास सुद्धा घेतले त्यामुळेच विद्यार्थ्यांना भरघोस यश प्राप्त झाले याबद्दल या सर्व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.













