Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णु शिंदे यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते  जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णु शिंदे यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान
Ashok Ithape
  • PublishedMay 4, 2025

सातारा दि. 1 :   जिल्हा माहिती कार्यालय   वाहन चालक विष्णू पांडुरंग शिंदे  यांनी आपल्या 35 वर्षाच्या सेवा कालावधीत आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडल्या. याशिवाय छायाचित्रण, चित्रीकरण असे अन्य विशेष कामकाजही अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळले आहे. त्यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींशी अत्यंत चांगला जनसंपर्क जपला व शासकीय कार्यक्रम योजना, ध्येय धोरणे, यशकथा यांची सर्वदूर प्रसिद्धी करण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले.

1 मे महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनानिमित्त श्री. शिंदे यांनी  अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने व कर्तव्यदक्षपणे बजावलेल्या सेवेकरिता   उत्कृष्ट कर्मचारी  म्हणून  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी,  कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!