Thu, Jan 15, 2026
देश विदेश

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या भरत मुनी दीर्घा या प्रदर्शन स्थळामध्ये मांडण्यात आली लान्स डेन कलेक्शनमधील मुखवट्यांची मालिका

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या भरत मुनी दीर्घा या प्रदर्शन स्थळामध्ये मांडण्यात आली लान्स डेन कलेक्शनमधील मुखवट्यांची मालिका
Ashok Ithape
  • PublishedApril 25, 2025

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2025

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या (आयजीएनसीए) तळमजल्यावर नव्याने विकसित केलेल्या  ‘भरत मुनी दीर्घा’ या प्रदर्शन स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. आयजीएनसीएमध्ये ‘फेसेस ऑफ ट्रॅडिशन्स अँड डिव्हिनिटी अँड मॅजेस्टी: मास्टरपीस फ्रॉम द लान्स डेन कलेक्शन’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन आयजीएनसीए अभिलेखागारात जतन केलेल्या लान्स डेन कलेक्शनमधील मुखवटे प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे. आयजीएनसीएचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक (प्रशासन) डॉ. प्रियांका मिश्रा, अधिष्ठाता (शैक्षणिक) प्रा.प्रतापानंद झा, कलाकोश विभागप्रमुख प्रा.सुधीर लाल, आयजीएनसीएच्या मीडिया सेंटरचे नियंत्रक अनुराग पुनेथा उपस्थित होते.

डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर संवर्धन आणि सांस्कृतिक अभिलेखागार विभाग, तसेच सर्व संबंधित टीम्स चे अभिनंदन केले, ज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे प्रदर्शन प्रत्यक्षात आले. ते पुढे म्हणाले की, जागा सुशोभित करण्याच्या प्रक्रियेत अशा जागांच्या कोपऱ्यांकडे अनेकदा केले जाते. हे लक्षात घेऊन, आयजीएनसीएचे कॉरिडॉर आणि इतर जागांचे प्रदर्शन स्थळात रूपांतर करण्याचा दृष्टीकोन होता. हे केवळ गॅलरी म्हणून नव्हे, तर स्थळ म्हणून उपयोगात येईल, जे केवळ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे विविध पैलू अधोरेखित करणार नाही, तर सामान्य नागरीक, संशोधक आणि अभ्यासकांपर्यंत ज्ञानाचा प्रसार देखील करेल.

अशा उपक्रमांमुळे आयजीएनसीए देशातील प्रमुख सांस्कृतिक संस्थांपैकी एक होईल, अशी कल्पना  डॉ. जोशी यांनी मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, प्रा.अचल पंड्या यांनी सांगितले की, डॉ.सच्चिदानंद जोशी यांनी या उपक्रमाची प्रेरणा दिली. आयजीएनसीए सुरुवातील जनपथ इमारतीत स्थलांतरित झाले, तेव्हा त्या जागेत गॅलरीज नव्हत्या असे ते म्हणाले. त्यानंतर दर्शनम 1 आणि दर्शनम 2 गॅलरीजची स्थापना झाली, आणि आता या सांस्कृतिक विकासात नवीन भर म्हणून भरत मुनी दीर्घा’ उभारण्यात आली आहे. प्रा.पंड्या यांनी, सांस्कृतिक दृष्ट्‍या महत्त्वाच्या वस्तू फिरत्या ठेवून आणि प्रदर्शित करून अभ्यागत आणि आयजीएनसीए च्या कर्मचाऱ्यांमध्ये कुतूहल जागवण्यासाठी सुरु केलेल्या, ‘मास्क ऑफ द वीक’ आणि ‘ऑब्जेक्ट ऑफ द वीक’ या  दोन नवीन उपक्रमांबद्दल सांगितले. हे उपक्रम प्रदर्शनात खोलवर गुंतून जायला प्रोत्साहन देतील, आणि भारताच्या पारंपरिक कलात्मक अभिव्यक्तीबद्दलची प्रेक्षकांची समज व्यापक बनवतील .

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!