काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा, दि.23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले सातारा जिल्ह्यातील कोणतेही नागरिक तेथे अडकले असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 02162-232175 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी केले आहे.
संपर्क – जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. फोन नं. 02162-232175
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. देविदास ताम्हाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा मोबाईल क्र. 9657521122
तसेच काश्मिर मधील पहेलगाव येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या ठिकाणी पर्यटक अडकले असल्यास त्याबाबतची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी श्रीनगर येथे खालीलप्रमाणे हेल्पलाईन्स स्थापन करण्यात आलेली आहे.
श्रीनगर येथील संपर्क क्रमांक :१)दूरध्वनी:0194-2483651,0194-
२) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397













