Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

तालुक्यांच्या ठिकाणी होणार सरपंच पदांची सोडत

तालुक्यांच्या ठिकाणी होणार सरपंच पदांची सोडत
Ashok Ithape
  • PublishedApril 22, 2025

वाई तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे होणार आहे.

सातारा दि. 22 : शासनाकडून प्राप्त झालेल्या सरपंच आरक्षणानुसार सातारा जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय सरपंच आरक्षणाच्या जागा निश्चित करुन प्रवर्ग निहाय वाटप करण्यात आलेल्या आहेत. सरपंच पदासाठी सोडत ही प्रत्येक तालुकास्तरावर होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा तालुक्याची सरपंच सोडत 23 एप्रिल रोजी स्व.आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे, जावली तालुक्याची सोडत 25 एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृह, मेढा, खंडाळा तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी किसन वीर सभागृह पंचायत समिती, वाई तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, कोरेगाव तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी तहसील कार्यालय, पाटण तालुक्याची सोडत 24 एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुल, काळोली, फलटण तालुक्याची सोडत 24 एप्रिल रोजी सजाई गार्डन मंगल कार्यालय, महाबळेश्वर तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी मध संचालनालय सभागृह, माण तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी माऊली मंगल कार्यालय, खटाव तालुक्याची सोडत 23 एप्रिल रोजी बचत सभागृह पंचायत समिती वडूज, व कराड तालुक्याची सोडत 24 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल) येथे होणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!