Mon, Mar 2, 2026
साहित्य

डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले यांना राज्यस्तरीय “पलपब” समाजभूषण पुरस्कार जाहीर

डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले यांना राज्यस्तरीय “पलपब” समाजभूषण पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedApril 12, 2025

वाई : बावधन ता वाई येथील साहित्यिक डॉ जनार्दन पांडुरंग भोसले २०२५ सालचा राज्यस्तरीय “पलपब समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘पलपब’ साहित्य प्रकाशन, अहमदाबाद, गुजरात या प्रख्यात संस्थे तर्फे राज्यात अनेक ठिकाणी साहित्य विषयक उपक्रम राबविले जातात.

११ मे २०२५ पलपब सातारा साहित्य समिती मार्फत आयोजित “सातारा अजिंक्य साहित्य संगम २०२५ ” संमेलनाच्या निमित्ताने संस्थेला अनेक प्रस्ताव प्राप्त झाले ले आहेत. या प्रस्तावा मधून तज्ञ निवड समितीने डॉ जनार्दन भोसले यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील योगदाना बद्दल त्याना २०२५ चा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे संयोजक पलपब प्रकाशनचे कार्यकारी अधिकारी सौ. लीना पाटील यांनी निवडपत्रा मार्फत कळविले आहे.

११ मे २०२५ रोजी सातारा येथील स्वराज कॉन्फरन्स हॉल, रहिमतपूर रोड ,कोडोली येथे होणार आहे महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक समारंभ होत असल्याचे पलपब प्रकाशन चे महाराष्ट्र अध्यक्ष श्री किरण तोडकर, सूर्यवंशी सर आणि सातारा अध्यक्ष श्री विजय कदम यांनी कळविले आहे.

डॉ जनार्दन भोसले यांनी लिहिलेल्या “फ. म. शहाजिंदे यांच्या कवितेतील निधर्मीवाद ” या साहित्य कलाकृतीची सन २०२५ च्या राज्यस्तरीय ‘पलपब साहित्यभूषण पुरस्कार ‘ जाहीर झाल्या बद्दल सातारा, वाई, बावधन आणि पुणे येथील साहित्यिक,राजकीय मान्यवरांनी कौतुक केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!