Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

श्री. सदगुरू नारायण महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य हे अनेक पिढ्यांन संस्कार देणारे ज्ञानपीठ

श्री. सदगुरू नारायण महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य हे अनेक पिढ्यांन संस्कार देणारे ज्ञानपीठ
Ashok Ithape
  • PublishedApril 12, 2025

भुईंज : श्री. सदगुरू नारायण महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य हे पिढ्यांन पिढ्याना संस्कार देणारे ज्ञानपीठ ठरणार असून दत्तगुरूंचा महिमा जपत व श्री क्षेत्र नारायणपूरचा भक्तीसागर जगभरातील भाविकांना सदैव तृप्त करेल फक्त भक्तांनी आणि भाविकांनी श्रद्धे ची ओंजळ पुढे करावी असे प्रतिपादन उद्योगपती व नारायणपूरचे शिष्य विकासनाना फाटे यांनी केले.

आचार्य भृगूऋषी मठावर विश्वचैतन्य प. पू. श्री. सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांच्या सातव्या मासिक स्मृती व्याख्यानात उद्योगपती व नारायणपूरचे शिष्य विकासनाना फाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विठ्ठलराव जाधवराव होते. यावेळी रसाळ पाटील व दिगंबर भिंताडे विशेष उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना उद्योगपती व नारायणपूरचे शिष्य विकासनाना फाटे पुढे म्हणाले की श्री. क्षेत्र नारायणपूरचा दत्त महिमा हा भाविक भक्तांना नेहमीच सुखावत आला आहे. या संस्थांनचे संस्थापक श्री. सदगुरू नारायण महाराज यांनी केवळ लोक कल्याणासाठी अखंड देह झिजवत अखेरपर्यंत आपल्या अध्यात्मिक चैतन्याच्या बळावर जगभरात नवीन उर्जा व नवचैतन्य दिले यामुळेच माझ्या सारखे शिष्य घडले. सदगुरूंनी आपल्या वाणीतून केलेले उपदेश व संस्कार यामुळे व्यसनाधिन झालेली अनेक कुटुंबे नव्याने उभी राहिली. बीगर हुंडा सामुदायिक विवाह चळवळ राबवून त्यांनी कर्ज बाजारीपणा नाहीसा केला. तर वृक्षरोपन व सामुदायिक शेती यांचा प्रयोग करून समाजातील मरगळ नाहीसी केली अनेक ग्रंथांचे निर्मिती करून त्या ग्रंथांना जेष्ठ विचारवंत के. बाळासाहेब भारदे यांनी प्रास्तावना दिली व त्याच विचारांचा जागर भारदे यांनी अखेर पर्यंत केला. एवढे महान कार्य श्री सदगुरू नारायण महाराजांनी उभे केले त्याचा एक भाग भुईज येथील आचार्य भ्रूगुरुषी आश्रम असून देशाच्या चारहि दिशेला हे तिर्थक्षेत्र व इथला भावीक पोहचवण्यात सदगुरू आण्णा महाराज यांनी मानव जोड अभियानाचे स्वप्न पुर्ण केले असे हि ते म्हणाले.

प्रारंभी प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी प्रास्ताविकात तिर्थक्षेत्र भुईंजची माहिती सांगितली. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास जाधव यांनी स्वागत केले ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग शेवते यांनी आभार मानले. श्री सदगुरू आण्णांच्या लेकी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. तर सुत्रसंचालन जयवंत पिसाळ व जगन्नाथ दगडे यांनी केले.

फोटोओळी : भुईज येथे मासिक स्मृती व्याख्यान मालेप्रसंगी उद्योगपती व नारायणपूरचे शिष्य विकासनाना फाटे व भाविक भक्तगण

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!