Mon, Mar 2, 2026
शिक्षण

तब्बल ३९ वर्षानंतर ज्ञानमंदीरापासून दुरावलेली चिमणी पाखरं स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र

तब्बल ३९ वर्षानंतर ज्ञानमंदीरापासून दुरावलेली चिमणी पाखरं स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र
Ashok Ithape
  • PublishedApril 10, 2025

भुईंज : तव्वल ३९ वर्षानंतर ज्ञानमंदीरापासून दुरावलेली चिमणी पाखरं स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आणि सुरू झाला पुन्हा नवीन प्रवास सुख दुःखच्या अनेक पायवाटा आणि रस्ते ओलांडणा-या मनाला आणि शरीराला धावणारा महामार्ग भुईज येथे थांबवतो अशी ताकद भुईज हायस्कुलने दिली. अशा वोलक्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनो चालत रहा असा गुरूमंत्र घेवून सामोरो जा असे प्रतिपादन प्रा. विजयसिंह पिसाळ व प्रा. एम. के. मुल्ला यांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज भुईज येथे सन १९८६-८७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिकलेल्या व आज वयाची ५५ वर्ष पुर्ण करणा-या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. नेपाळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांपासून ते देशभरात तज्ञ कला शिक्षक म्हणुन वावरणारे प्रा. लक्ष्मण गडगे या सारख्या गुरूजनांनी ३९ वर्षानंतर शाळेच्या भिंतीहि वोलक्या केल्या. दहावी शिकल्यानंतर आपल्या पुढील वाटा चोखाळणारे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर करियरच्या वाटा शोधत वेगवेगळ्या क्षेत्रात जोडले गेले. कुटुंब व्यवस्था जबाबदारी विवाहानंतरची बांधिलकी जोपासत विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सतत व्यस्त राहिले पण प्रत्येकाला कुठेतरी हरवल्यासारख काहीतरी चुकल्यासारख जाणवत होत. ते नेमक स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वासमोर व्यक्त झाल आणि अजूनहि वेळ गेली नाही अस सांगत चला पुन्हा आता नव्याने मैत्रीची बंधने जोडू या. सुख दुःखाच्या देवाण घेवाणीतून संवाद साधत राहू या. आयुष्याच्या मध्येतरी गुरूजनांचे आशिर्वाद घेवून नवीन उर्जा पाठीशी घेत ३५ माजी विद्यार्थी व २५ माजी विद्यार्थीनी यांची गाठ सुर्यकांत उर्फ पिंटू बुवा जाधव यांनी बांधून हा स्नेह मेळावा आयोजित केला यासाठी प्राचार्य दिपक ढाणे यांचेसह विद्यालयाचे माजी शिक्षक प्रा. एच. एस. निकम, प्रा. एस. व्ही पाटील, प्रा.पी. के. माने, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. इंगोले, पा. सौ. पिसाळ, प्रा. श्रीमती मांढरे आदी गुरूजनांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

हा स्नेहमेळावा आयोजित करण्यासाठी आरिफ मोमीन, सुर्यकांत जाधव, दत्तात्रय शेवते, विजयसिंह जाधवराव, राहुल पवार, धनंजय जाधवराव, नंदकुमार दाभाडे ,वनिता खरे,गोरे,यांनी विशेष प्रयत्न केले सुत्र संचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले तर आभार साहित्यिक लेखक रणजित ताम्हाणे यांनी केले प्रास्ताविक आंबेजोगाइ साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगम यांनी केले.

फोटो ओळी : स्नेहमेळाव्या निमित्त विद्यार्थ्याच्या समवेत शिक्षक

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!