Mon, Mar 2, 2026
शिक्षण

भुईंज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रयतचे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले – श्री.भैय्यासाहेब जाधवराव

भुईंज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रयतचे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले – श्री.भैय्यासाहेब जाधवराव
Ashok Ithape
  • PublishedApril 6, 2025

भुईंज : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,भुईंज येथे रयत गुरुकुल प्रकल्पा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात आणि स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन केले जाते.यामुळे विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवत आहेत. शासनाच्या वतीने त्यांना भरघोस अशी शिष्यवृत्ती प्राप्त होत आहे.त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे खऱ्या अर्थाने सार्थ ठरत आहे.असे मनोगत रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा.श्री भैय्यासाहेब जाधवराव यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले.

ग्रामीण भागातील गुणवत्ता ही खऱ्या अर्थाने देशाचे भूषण आहे आणि ते भुईंज सारख्या ग्रामीण भागात विद्यालयाच्या माध्यमातून साध्य होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कु. सोनाक्षी प्रवीण शिंगटे,वेदांत दीपक केंडे,श्लोक शिवम वरुडे,आणि सारथी शिष्यवृत्तीधारक 46 विद्यार्थी, भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झालेले दिगंबर दत्तात्रय सुतार, सई संतोष बाबर,यश जितेंद्र बाबर, जान्हवी सचिन गायकवाड , रयत शिक्षण संस्था ,सातारा कर्मवीर विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या रयत टॅलेंट सर्च परीक्षेत श्रेयश सुभाष पवार,शर्वरी दौलत सूर्यवंशी या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच एन एम एम एस विभाग प्रमुख सौ चित्रा भोज, इन्स्पायर अवॉर्ड विभागप्रमुख सौ संगीता जाधव, आरटीएस विभाग प्रमुख श्रीमती हर्षदा इताले आणि सर्व विषयशिक्षक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष डॉ. मनोहर दातार यांच्या वतीने विद्यालयास जलशुद्धीकरण यंत्रणा भेट देण्यात आले. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की तंत्रज्ञानाचा उपयोग अभ्यासासाठी करावा त्यामधूनच विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे उन्नती होऊ शकते. विज्ञान-तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे त्याचा उपयोग आपण सकारात्मक कार्यासाठी करावा.

प्रास्ताविक करताना मा प्राचार्य श्री दिपक ढाणे यांनी सांगितले रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्प यांच्यावतीने स्पर्धा परीक्षांचे नियोजनबद्ध कामकाज करून ते विद्यालयामध्ये परिपूर्णपणे राबवले जाते त्यामुळे हे सामूहिक यश मिळाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे पुढील चार वर्षांमध्ये 20 लाख रुपये शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पर्धा परीक्षा , क्रीडा, सहशालेय उपक्रम प्रभावीपणे राबवला जाणारे उपक्रम भुईंज पंचक्रोशी मधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.उत्कृष्ट ज्ञानदान करणारे हे संकुल असेच बहरत राहील असे सांगितले. कार्यक्रमाला रोटरी क्लब वाईच्या सेक्रेटरी अर्चना पाठक मॅडम,स्कूल कमिटी सदस्य श्री उत्तमराव भोसले, श्री अशोकराव शिंदे, उपमुख्याध्यापक शेख सर ,ज्येष्ठ शिक्षिका सौ मीनाक्षी साठे, पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय नवले,श्रीमती हर्षदा इताले,यांनी केले. आभार पर्यवेक्षक श्री संजयकुमार पतंगे यांनी मानले.

भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात घडलेले कै. राजेश स्वामी साहेब आय एफ एस ओ अधिकारी होते की त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कामकाज केले. राजेश स्वामी साहेबांसारखे असे अनेक विद्यार्थी या शाळेत घडले व त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा व भुईंज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे नाव सातासमुद्रापार पोहचऊन संस्थेचा नावलौकिक वाढवला याचे सर्वश्री श्रेय हे भुईंज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षकांच्या चांगल्या शिक्षणामुळेच शक्य झाले असून प्रत्येक क्षेत्रात आजही या शाळेचे विद्यार्थी संस्थेसह शाळेच्या नावलौकिकात भर घालीत आहेत.

फोटो ओळी: यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव- इनामदार, प्राचार्य दीपक ढाणे, डॉ मनोहर दातार, उत्तमराव भोसले, अशोकराव शिंदे, वाई रोटरी क्लबच्या अर्चना पाठक व शिक्षक शिक्षिका,

छायाचित्र किशोर रोकडे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!