Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या अन्नछत्र प्रसादालयाचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या अन्नछत्र प्रसादालयाचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedApril 1, 2025

कदमवाडी (ओझर्डे) येथे भजन, कीर्तन, महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

भुईंज : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अन्नपूर्णा माता की जय या नामाच्या जयघोषात सोमवार दि.३१ मार्च रोजी कृपासिंधु श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बांधलेल्या चार मजली अन्नछत्र प्रसादालय कलशारोहण व लोकार्पण सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाचे औचित्य साधून श्री. स. स. आनंद काडसिद्धेश्वर स्वामी ( कोल्हापूर), प. पू. नंदगिरी महाराज (सोळशी),श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज( वाई), प. पू. श्री ब्रह्मानंद स्वामीजी सद्गुरू धाम ( कनूर) यांच्या हस्ते व सकाळ माध्यम समूहाचे मुख्य व्यवस्थापक राजेश निंबाळकर, श्रीधर कंग्राळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो स्वामी भक्तांनी गर्दी केली होती. प्रचंड भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला.

यावेळी मटाधिपती संतोष कदम महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.दरम्यान श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित सुरू असलेल्या पारायण सोहळ्याची सांगता सकाळी ११.३० वाजता काल्याच्या कीर्तन सोहळ्याने झाली.
भजन,कीर्तन,महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कृपासिंधु श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट कदमवाडी यांनी लोकवर्गणी मधून बांधलेले अन्नछत्र हे खूप अभिमानास्पद आहे. आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त याचे लोकार्पण झाले याचा मनोमन खूप आनंद आहे. हजारो नागरिक याठिकाणी भक्तिभाव मनात घेऊन जिल्हाभरातून येत आहेत. अन्नदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे. या भव्य कार्यासाठी राबलेल्या सर्व पदाधिकारी, सदस्य, सेवेकरी, कर्मचारी, ज्ञात अज्ञात देणगीदार यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा.

– ना.मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र

 

देवस्थान ट्रस्ट चे नेटके नियोजन 

बाहेर गावावरून आलेल्या हजारो गाड्यांची गर्दी जोशीविहिर वाई या मुख्य रस्त्यावर दुतर्फा झाली होती.ही लक्षात घेऊन येथील ट्रस्ट ने रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या शेतांमध्ये पार्किंग व्यवस्था केली होती. पार्किंग व इतर व्यवस्था चोख झाल्यामुळे भक्ताना सुखर पद्धतीने दर्शन व महाप्रसादाचा लाभ मिळाला. यावेळी आलेल्या हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सर्व पदाधिकारी, स्वामी भक्त यांनी या नेटक्या नियोजनासाठी दिवसभर कष्ट घेतले.

फोटो ओळी : अन्नछत्र इमारतीचे लोकार्पण करताना श्री. स. स. आनंद काडसिद्धेश्वर स्वामी , प. पू. नंदगिरी महाराज,श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, प. पू. श्री ब्रह्मानंद स्वामीजी सद्गुरू धाम, श्रीधर कंग्राळकर, मटाधिपती संतोष कदम व इतर मान्यवर

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!