सामाजिक ऐक्य जपत ईद साजरी करावी ; वाई उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे प्रतिपादन
भुईंज : सामाजिक ऐक्य जपत ईद साजरी करावी असे प्रतिपादन वाई उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी केले.
भुईंज ता. वाई येथील जामामस्जिद मध्ये ईद सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम बोलत होते. यावेळी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, भुईंज जामा मस्जिदचे आरिफ मोमीन, नुकतेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले जैद मोमीन, आयाज चाऊस, मुस्तफा मोमीन, समिर मणेर, भुईंज पोलीस स्टेशनचे सचिन नलावडे, शिवाजीराव तोरडमल, वैभव टकले, चंद्रकांत भोसले, आप्पासाहेब कोलवडकर, सुशांत धुमाळ, नितीन जाधव, सतीश कदम, आदि मुस्लिम समाजाचे मान्यवर हजर होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब भालचिम म्हणाले की भुईंज मुस्लिम समाजाच्या वतीने आजपर्यंत केलेले सण हे सामाजिक ऐक्य जपत आणि गावचा एकोपा कायम राखत साजरे केले, तसेच ईदचा सण सुद्धा सामाजिक ऐक्य जपत साजरा करावा असे आवाहन करीत सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे म्हणाले की, भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच मुस्लिम बांधवांनी गुण्यागोविंदाने ईदचा सन साजरा करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे अवाहन ही यावेळी सपोनि रमेश गर्जे यांनी केले.
यावेळी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रमेश गर्जे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी करीम सय्यद फौजी, सादिक मोमीन, जुबेर मोमीन, अमीर मुलाणी, फारूक मोमीन, नौशाद मोमीन, अल्ताफ मोमीन अदि मुस्लिम समाजाचे मान्यवर हजर होते.













