Mon, Mar 2, 2026
कलाकार कट्टा

चिंधवली येथे भव्यदिव्य रांगोळीतून मराठी नववर्षाचे स्वागत

चिंधवली येथे भव्यदिव्य रांगोळीतून मराठी नववर्षाचे स्वागत
Ashok Ithape
  • PublishedMarch 30, 2025

श्री नवलाई मंदिरात रांगोळीच्या सप्तरंगातून संस्कृतीची झाली नव्याने ओळख.

भुईंज : शैक्षणिक वाटचालीचा आलेख उंचावत आपली यशस्वी ओळख निर्माण करताना या तरुण युवतींनी आपल्या रुढी, परंपरा आणि संस्कृतीचा सन्मान ही केला पाहिजे या उदात्त हेतूने आज गुढीपाडवा, मराठी माणसांचा उत्सव म्हणून चिंधवली ग्रामदैवत श्री नवलाई देवी मंदिरात सलग आठ तास परिश्रम घेऊन आकर्षक महारांगोळी रेखाटून मराठी नववर्षाचे स्वागत केले.

सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा, सण मराठी मनाचा, सण मराठमोळ्या संस्कृतीचा, सण प्रखर हिंदुत्वाचा, सण नव्या हर्षाचा, सण नव्या हिंदू वर्षांचा… म्हणून गुढीपाडवा हा मराठी सण हा सर्वदूर साजरा केला जातो.. प्रत्येक घरोघरी नव्या संकल्पनेची, नव्या आशेची आणि आपल्या रुढी परंपरेची, विश्वासाची गुढी उभारली जाते.

_*सण गुढीपाडव्याचा, उत्सव नववर्षाचा..*_

पाट (आसना) प्रमाणे प्रत्येकाला आयुष्यात स्थैर्य लाभावे,
सुपारीच्या गुणांतून सर्वांना संकल्पाची दिशा मिळावी,
श्रीफळा प्रमाणे प्रत्येकाला वेळोवेळी सिद्धी प्राप्त व्हावी,
वेळू काठी प्रमाणे प्रत्येकामध्ये सामर्थ्याची शक्ती यावी,
जरीच्या साडी प्रमाणे सर्वांमध्ये वैभव प्राप्त व्हावे,
साखर गाठी प्रमाणे प्रत्येकाच्या तोंडी माधुर्य प्राप्त व्हावे,
पुष्पहारा प्रमाणे सर्वांच्या आयुष्यात मांगल्य यावे,
कडुनिंबाच्या सहवासाने सर्वांचे आरोग्य कायमच निरोगी रहावे,
कलशा प्रमाणे तुमचे आयुष्य उत्तरोत्तर यशश्रीकडे वाटचाल करावे…
ह्याच मराठी नववर्षाच्या या मराठमोळ्या भव्यदिव्य रांगोळीतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत…

कलेची जादुई हातामध्ये असणाऱ्या कु.पल्लवी सिमला प्रभाकर निकम यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून साकारलेल्या रांगोळीस कु. प्रतिक्षा पवार व सौ वैशाली देवेंद्र पवार यांनी सहकार्य केले.
नेत्रदिपक रांगोळी बद्दल चिंधवली ग्रामस्थांनी सर्वांचे कौतुक केले.

दिपक पवार, चिंधवली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!