आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्राची लोकधारा घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र शाहीर ‘पद्मश्री कृष्णराव गणपतराव साबळे’
![]()
लोकशाहीर, लोकनाट्यकार, कृष्णराव गणपतराव साबळे “पद्मश्री शाहीर साबळे” यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो या बुलंद आवाजामध्ये धडधडणारी तोफ महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात पसरणी या खेडेगावी 3 सप्टेंबर 1923 वर्षी झाला. हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. वडील गणपतराव साबळे भजनामध्ये विठू माऊली चे अभंग गात असत. ते माळकरी होते. व घरची शेती करत असत. आई सुद्धा वारकरी संप्रदायातील असल्याने घरामध्ये भक्ती परंपरेचे वातावरण होते. शाहीर लहानपणी आई ज्यावेळी दळण दळत असे तेव्हा गीत, ओव्या मोठ्या मनोभावे ऐकत असत. दळण दळत असताना आईच्या मांडीवरती डोके ठेवून शाहीर गीते ऐकत असत.
आई-वडिलांपासून वारकरी सांप्रदायाचे संस्कारमय बाळकडू शाहिरांना घरातूनच प्राप्त झाले होते. तिसरी पर्यंतचे शिक्षण पसरणी(वाई)या जन्मगावी येथे झाले. त्यांच्या आईने पुढील शिक्षणासाठी शाहिरांच्या आजोळी मामांकडे अमळनेर येथे पाठवले. अमळनेर येथे सातवी पर्यंत शिक्षण झाले होते. त्या काळी हे शिक्षण खेडेगावात फार मोठे मानत असेल. परंतु शाहिरांना सातवीची परीक्षा देता आली नाही. अंबळनेर येथे साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला. एकदा शाळेतील कार्यक्रमा मध्ये प्रसिद्ध हिराबाई बडोदेकर यांना शाहिरांचा आवाज आवडला. त्यांनी कौतुकाचे हात पाठीवर फिरवून शाब्बासकी दिली. संत गाडगे महाराज हे सुद्धा येथे शाहिरांशी येथेच संपर्क झाला होता. आवाजाचा गोडवा असणारा चुनचुनित मुलगा व राष्ट्रीय कार्यामध्ये हिरीरीने भाग घेणारा संत गाडगे महाराजांच्या नजरेस पडला. तर त्यांच्या आजीकडे या मुलांची मागणी राष्ट्र कार्यासाठी केली. परंतु परक्याचे पोर मला देता येणार नाही. माझ्या विश्वासावर त्याचा संभाळ आणि शिक्षणासाठी पाठवले आहे. मी भोळी भाबडी असली तरी मी माझ्या मुलाला तुम्हाला देणार नाही ठणकावून सांगून आजीने स्पष्ट नकार दिला होता.
शिक्षण घेत असताना शाहिरांना त्यांच्या आवाजाची चाहूल लागली होती. आपण उत्तम गायन करू शकतो. आणि आवाजात अत्यंत ओजस्वी वाणी दिसून येत होती. त्यांनी शाहिरी बाज घडवून आणण्याची किमया केली. अमळनेर येथून मुंबईला कुर्ला येथे चुलत्यांकडे आले होते. चुलत्यांनी स्वदेशी मिल मध्ये शाहिरांना कामाला लावले होते. शाहीर आणि जागृती शाहीर मंडळाची स्थापना कुर्ला येथे १९४५ ला केली. यातूनच उत्कृष्ट भजन आणि शाहिरी कवणे रचून स्वतः गात असत. अभ्यासात व शिक्षणाकडे लक्ष नसलेल्या शाहिरांना आजीने पसरणीला सातवीची परीक्षा न देता पाठवले.
शाहीर वडिलांना शेतीमध्ये कामामध्ये मदत करत असत.शाहिरी पिंड असल्यामुळे ते भजनामध्ये उत्तम गाऊ लागले.हळूहळू त्यांचा स्वर चांगल्या प्रकारे गायन करू लागले.त्यांच्या वडिलांनी भावाकडे मुंबईला पाठवल्यानंतर शाहिरी लोकरंजन कार्यक्रम करू लागले व नोकरी सांभाळून ते स्वदेशी मिल मध्ये काम करत होते.त्यांचे त्या कामगार क्षेत्रामध्ये मन रमत नव्हते. 1945 -46 वर्षी गुपचूप लिलाबाई मांजरेकर यांच्या तमाशा फडामध्ये काम करू लागले. ही बातमी त्यांच्या काकांना(चुलत्यांच्या) कानी पडली.
काम धंद्यामध्ये प्रगती करत नाही म्हणून पुन्हा त्यांना गावी पसरणी येथे पाठवणी केली. तरीसुद्धा शाहीर गायनापासून दूर होत नव्हते.घरची कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे आईने पुन्हा विनंती करून काकांकडे मुंबईला पाठवले.शाहीर यांचे मन गिरण कामगार म्हणून रमत नव्हते. भजन कथा, गीते, देशभक्तीवर गाणी,भारुडे वाघ्या मुरळी, शाहिरी पोवाडे, लोकनाट्य, नाट्य निर्मिती करत प्रत्येक मुंबईत चाळीमध्ये कार्यक्रम शाहीर करत असत. त्यांचा बरेच संबंध देश स्वातंत्र्य चळवळीत शाहिरी कार्यक्रमातून लोकजागरण करत असत. गावच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, श्री जेजुरीकर, साने गुरुजी यांच्या मार्गदर्शक खाली गावचे काळ भैरव मंदिरात प्रवेश दिला. आणि ते एक दूरदृष्टी परोपकारी कलावंत म्हणून नावाला रूपाला आले.
अस्पृश्य रंजल्या गांजल्या लोकांचे कैवारी झाले. असंच एक त्यांचा कार्यक्रम सातारा येथील फलटण मध्ये मधोजी हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन निमंत्रण आले .त्यांनी तो कार्यक्रम हायस्कूलमध्ये सादर केला.त्याच हायस्कूलची विद्यार्थिनी या शाहिरांच्या आवाजाच्या जादूवर भाळली गेली. ती मुलगी प्रसिद्ध डॉक्टरची कन्या होती.पुढे भानुमती घरातून विरोध एकट्या येऊन पसरणी यात्रे दिवशी शाहीर बरोबर विवाह केला व त्यांच्या जीवनसाथी झाल्या. त्या होत्या कवयित्री शाहीर भानुमती साबळे. शाहिरांच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये मोलाचे कार्य कवी भानुमती यांनी केले.पुढे त्यांचा संसार मुंबई परळ या ठिकाणी फुलला गेला.त्यातूनच उत्कृष्ट विठू रायाची भजने आणि शाहिरी पोवाडे,कवणे शाहीर गात असत. त्यांना मोलाची साथ कवियत्री शाहीर भानुमती साबळे यांची लाभली.त्या गाण्याची कवितेची निर्मिती करत असत आणि शाहीर उत्कृष्ट रचना देऊन गात असत.
शाहीर सुंदर बासरी वादक होते, उत्तम ढोलकी वादक होते.शाहिरांच्या प्रगतीमध्ये व जडण घडींमध्ये मोलाचा दगड कवियत्री भानुमती साबळे यांनी पाया रुचून देऊन महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शाहीर यांना प्रसिद्ध करून दिले. आणि मोलाची साथ त्यांना लाभली, शाहिरांना प्रसिद्धी महाराष्ट्रात नव्हे तर देशाला मिळवून दिली असेल ती कवियत्री शाहीर भानुमती साबळे यांच्या लिखाणातून, वाङ्मयातून निर्मिती होऊन शाहीर सुमधुर आवाजात गात असत.शाहीर यांनी या संधीचं सोनं करून घेतलं. व देशभर अजमारं शाहीर होऊन गेले. मुंबई मायानगरीमध्ये संसाराचा गाडा हाकत असताना काही वर्ष मिलमध्ये नोकरी करत होते.आणि आपले कार्यक्रम महाराष्ट्रा भर सादर करत होते. 1960 वर्षी यम राज्यात एक रात अभियनात पाऊल ठेवले.मुंबईत साने गुरुजींच्या आशीर्वादाने शाहीर साबळे आणि पार्टी स्थापना केली. त्याचवेळी त्यांच्या कार्यक्रमाचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रात होत होता.
आकाशवाणी ध्वनीमुद्रित पोवाडे, राष्ट्र पर भक्ती गीते, वाघ्या मुरळी, देशभक्ती गीते,देव देवतांची पारंपारिक गाणी, ओव्या, भारुडे, दारूबंदी प्रसारक गीते गाण्याची संधी त्यांना एचएमव्ही कंपनीकडून प्राप्त झाली. त्याचवेळी त्यांचा संपर्क कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यात आला. आणि त्यांची महत्त्वपूर्ण साथ शाहिरांना मिळाली. १९४२ वर्षे शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून शाहिरी कलेचे धडे शाहीर शिकले. गुरूंचे नाव दैपिमान करून ठेवले देश स्वातंत्र्याच्या काळातील पडद्यामागून काम करणारे एकमेव शाहीर होते.हा संपूर्ण काळ शाहीर साबळे यांचा करमणुकी क्षेत्रामधील सुवर्णकाळ होता. परंतु काही कारणास्तव व त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला.आयुष्यभर कष्टही वेचले.
मराठा मंदिर मालकाकडून त्यांनी ओपन थिएटर कर्ज घेतले होते. कोल्हापूरच्या महादू मिस्त्री यांच्याकडून फिरता रंग मंच करून घेतला होता.याचा संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यक्रमाच्या माध्यमातून दौरे चालू होते. एक अष्टपैलू शाहीर उदय होत असतानाच अधोगतीच्या मार्गाकडे परतू लागले.त्यावेळी मनोरंजनाची अमूर्त साधने होती. परंतु शाहीर आणि कर्मणुकीच्या क्षेत्रातून समाज प्रबोधन करण्याचे मोठे भाग्य एकमेव शाहीर यांना लाभले होते.आणि ते मराठी जगतावर राज्य स्व:कर्तुत्वावर उमटवले होते. पुढे त्यांनी अधिराज्य गाजवून कर्तृत्व सिद्ध केले होते.अशावेळी शाहीर दुहेरी संकटात सापडले होते. एक म्हणजे 1972 सालचा पडलेला महाराष्ट्रावर महादुष्काळ कारणीभूत होता. शाहीर साबळे अँड पार्टी सर्व कार्यक्रम बंद पडले होते. शाहीर साबळे आणि पार्टी दिवाळखोर झाली. त्यावेळी लाखो रुपयाचे कर्ज त्यांच्या डोक्यावर चढले होते.आणि व्याज वाढत जात होते.अचानक अशावेळी त्यांच्या धर्म पत्नी साथ सोडून माहेरी फलटणला निघून गेल्या.
देवदत्त फक्त सात वर्षाचे होते. जसं एखादा हिरा घडवण्याची काम कारागीर करतो.त्याच प्रकारचे का कवी शाहीर भानुमती साबळे यांनी शाहीरना घडवलं होतं, आणि अष्टपैलू शाहीर म्हणून महाराष्ट्रात नामचीन झाले होते. कार्यक्रमानिमित्त शाहिरांचे सतत दौरे होत असल्यामुळे संसाराकडे लक्ष द्यायला फार वेळ मिळाला नाही.आणि हे ईश्वराला कदाचित मान्य नसेल.म्हणून घेतलेला निर्णय शाहिरांच्या एक मोठा आघात होता.कर्जाचा बोजा त्यावर चढलेले व्याज आणि चार मुलांचे संगोपन, शिक्षण करणे ही सोपी गोष्ट त्यावेळी नव्हती. संसाराचा राहट कदाचित एवढं सोप्प काम नव्हतं.हा भयानक प्रसंग त्यांच्या जीवनात आला होता.अशी वेळ कोणावर येऊ नये. धैर्याने त्यांनी त्याला तोंड दिले.आणि त्यांच्या आयुष्यात एक सूर्य पहाट उगवली.त्यांच्या पार्टीला एका गाण्याच्या कार्यक्रमात सुगीचे दिवस आले. ते गाणे होते या दांड्यावर नवरा कुणाचा येतो. या गाण्यामुळे शाहीरांना सुगीचे दिवस आले.
श्री तानाजी फणसे, पर्यावरण संरक्षण नवी मुंबई













