Mon, Mar 2, 2026
शिक्षण सातारा जिल्हा

ज्ञानसंकल्प डिजिटल ज्ञानपीठातर्फे आता ‘अबॅकस पर्व’

ज्ञानसंकल्प डिजिटल ज्ञानपीठातर्फे आता ‘अबॅकस पर्व’
Ashok Ithape
  • PublishedMarch 29, 2025

गुढीपाडव्याला लोकार्पण ; रास्त फीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देणाऱ्या कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन.

अवघ्या एक रुपयात मिळणाऱ्या फ्रॅंचाईजीसाठी इच्छुकांनी साधावा संपर्क

सातारा / प्रतिनिधी : गतिमान आणि बदलत्या युगात मानवी जीवनशैली आणि वेगाने विस्तारत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीला चालना देणारा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अमूलाग्रह बदल घडवणारा सकारात्मक उपक्रम ज्ञानसंकल्प डिजिटल ज्ञानपीठातर्फे सुरू करण्यात येत आहे. या अबॅकस पर्वाचा आरंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येत आहे. इयत्ता पहिलीपासून पुढील इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी रास्त फी असलेल्या या कोर्सला ऍडमिशन घ्यावे तसेच शिक्षक व सुशिक्षित युवक- युवती, गृहिणी यांनी अवघ्या एक रुपयात मिळणाऱ्या फ्रॅंचाईजीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,

द ब्रिज वेल्फेअर एज्युकेशनल सोसायटी मार्फत ‘बदलत्या डिजिटल युगाचा ज्ञानकोश’ या ब्रीदवाक्यानुसार अबॅकस कोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. इयत्ता पहिलीपासून पुढील इयत्ता नववीपर्यंतचे विद्यार्थी या ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. ऑनलाइन स्वरुपात अबॅकसचे ज्ञान घेता येणार असल्याने विद्यार्थ्याला क्लासमध्ये पोहोचवणे- आणणे यासाठीचा पालकांचा वेळ वाचणार आहे. राज्यातील सर्वोत्तम दर्जाचा अभ्यासक्रम असलेल्या कोर्समुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
अवघ्या 4999/- रुपयांमध्ये या कोर्सला प्रवेश घेता येईल. त्यानिमित्ताने आयोजित स्पर्धेतही आपोआपच विद्यार्थ्याला सहभागी होता येईल. प्रवेशानंतर टी-शर्ट, अबॅकस स्लेट, मार्गदर्शक पुस्तिका, प्रमाणपत्र आणि ऑनलाईन मार्गदर्शन सुविधा मिळणार आहे.

स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना सायकल, एज्युकेशनल टॅबलेट, स्मार्ट वॉच, बॅडमिंटन किट, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, टिफिन बॉक्स, कॅरम बोर्ड, चेस बोर्ड या वस्तू स्वरूपातील बक्षिसांबरोबरच स्कॉलरशिपसुद्धा मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे.

स्पर्धेच्या गतिमान बदलत्या जगात आपली मुले बुद्धिमान बनवण्यासाठीचा हा कोर्स एक राजमार्ग असून त्या माध्यमातून अबॅकस बरोबरच ब्रेन डेव्हलपमेंट, बौद्धिक विकास, आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे ही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

याशिवाय या कोर्सच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठीची सक्षम पिढी घडवण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे सैनिक स्कूल प्रवेश, जवाहर नवोदय पूर्व परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, इंग्लिश, गणित आणि कलाअभिरुची आदी परीक्षांसाठीही या कोर्सचा उपयोग होणार आहे.

या कोर्सची रचना तज्ञ अभ्यासकांनी केली असून ज्ञान संकल्प डिजिटल ज्ञानपीठाचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण करण्यात येणार आहे.

या कोर्सच्या माध्यमातून सुशिक्षित युवक- युवती, गृहिणी, व्यावसायिक, तसेच शिक्षक मंडळींना फ्रेंचाईजी देण्यात येणार असून अवघ्या एक रुपयात फ्रेंचाईजी मिळणार असल्याने इच्छुकांनी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी 99 75 74 68 35 / 99 60 60 09 52 या नंबर वर संपर्क साधावा व रास्त फीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देणाऱ्या या कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲपद्वारे मिळणारे मार्गदर्शन रेकॉर्ड पुन्हा पुन्हा पाहता येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालकांनी अवश्य या कोर्सचा विचार करावा, असे अनेक जाणकारांनी म्हटले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!