महामार्गालगतच्या वटवृक्षाला जीवदान; पर्यावरण प्रेमी शिक्षक, विद्यार्थी व देवराईच्या प्रयत्नांना यश
भुईंज : पेटणारा वटवृक्ष शिक्षकाचे प्रसंगावधाना मुळे वाचला मदतीला धावले सयाजी शिंदे यांचे देवराई व सावकार इंजिनिअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजनेच्या दरम्यान रामनगर ते सावकार इंजिनिअरिंग कॉलेज या रस्त्यावर बाजूला असलेल्या वटवृक्षाच्या बुडाक्यात अचानक पेटलेल्या ज्वाळा येताना दिसू लागल्या व धुराचे लोट सुरू झाले, याच वेळी रस्त्यावरून विरमाडे कडे जाणारे शिक्षक प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत माती टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावरून जाणाऱ्या सावकार इंजिनिअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांना मदतीला बोलवले.
यावेळी सॅक मधील पाण्याच्या बाटल्या काढून आग विजवण्यासाठी अनेक मुली धावल्या पण आग नियंत्रण न होता वाढत राहिली त्यावेळी शिक्षक प्रकाश सोनवणे यांनी सयाजी शिंदे यांचेशी सम्पर्क साधत अग्निशमन यंत्रणा पाठवा असे सांगितले त्यावर सयाजी शिंदे यांचे देवराई चे कार्यकर्ते व सातारा नगरपालिका अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व आग विजवली.
दरम्यान सायंकाळी 7 वाजेपर्यंत आग विजवण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षक प्रकाश सोनवणे व विद्यार्थ्यांनी यांचे अनेक पर्यावरण प्रेमींनी कौतुक करीत धन्यवाद दिले.













