मराठी विश्वकोषाचे शिल्पकार, धर्मसंशोधक, विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळजी जोशी यांचा जन्म 27 जानेवारी 1901 रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर खेडेगावात झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं.संस्कृत शिक्षणासाठी वयाच्या 14 व्या.वर्षी सातारा जिल्ह्यामधील वाई येथे घरातून पाठवले. वाईच्या प्राज्ञपाठशाला मंडळामध्ये स्वामी केवलानंद सरस्वती म्हणजेच(नारायणशास्त्री मराठे)यांच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली साहित्य वैदिक,संस्कृत व हिंदू प्राचीन संस्कृतीवर अभ्यास करण्यासाठी आले होते. यांची भेट होऊन गुरुतुल्य मानले गुरुस्थानी महत्व दिले.नारायणशास्त्री मराठे आदर्श शिक्षक होते.ते एक संस्कृतमध्ये व्यसंगी शिक्षक होते.त्यांचे व्यसनगातून वेदशास्त्र,संस्कृत, तर्कशास्त्र,धर्मशास्त्र आत्मसात केले होते. नारायणशास्त्री मराठे यांच्याकडे आचार्य विनोबा भावे वेदशास्त्र व संस्कृत शिकण्यासाठी वाई मध्ये आले होते.आचार्य विनोबा भावे 22 वर्षाचे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी 14 वर्षाचे व त्यांना शिकवणारे नारायणशास्त्री मराठे गुरुजी 40 वर्षाचे होते. त्यावेळी अस्पृश्यांना वेद शास्त्र व धर्मशास्त्र शिकण्याचा हक्कच नव्हता. ते वर्ष 1917 होते. त्यावेळी नारायणशास्त्री मराठे यांना आचार्य विनोबा भावे व तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी शब्द दिला. आम्ही अस्पृश्यांना वेदशास्त्र शिकून प्रसार करू व जनसामान्य दलित लोकांपर्यंत पोहोचू. आणि विनोबा भावे शिक्षणासाठी वाई मध्ये थांबले.
अशा वातावरणामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे अध्ययन सुरू झाले.गुरुवर्य नारायणशास्त्री मराठे यांचा साहित्य कला संस्कृती वेद शास्त्र वरती गाढा अभ्यास होता.तेच ज्ञान दोघांनी आत्मसात करून पुढे देशभर प्रसार आणि विस्तर्ण व्यापकता निर्माण करून प्रसार केला. त्याच वेळी 1917 वर्षी लोकमान्य टिळक यांचे वाई येथे आगमन होऊन वास्तव्य झाले होते.पुढे त्यांना टिळकांचा गीतारहस्य या ग्रंथातून सखोल अभ्यास करता आला व ज्ञान प्राप्त झाले.त्यांच्यावर त्या गीता रहस्य ग्रंथाचा अत्यंत प्रभाव पडून पुढे ज्ञानवर्धन निर्मितीसाठी एकदा झाला.पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनी संस्कृत,वेधशास्त्र,इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवले. त्यांनी तर्कतीर्थ पदवी कोलकत्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयात मिळवली.हेच पुढे तर्कतीर्थ शास्त्री महाराष्ट्रात नव्हे तर देशभर प्रसिद्ध झाले. पश्चिम बंगाल मधील मावेंद्रनाथ रॉय यांचा प्रभाव जीवनावरती खूप पडला. त्यांच्या विचार सरणीवरून त्यांच्या पक्षाचे कामकाज केले.त्यावेळी ही पदवी मिळवणारे एकमेव मराठी होते. पुढे त्यांनी हिंदू संस्कृतीचा, धर्माचा व धर्मशास्त्राचा सखोल गाढा अभ्यास केला.अस्पृता निर्मूलन यावर त्यांनी मोठा लढा दिला.आणि कर्मकांड समाजापासून मुक्ती केली. त्यावेळी कर्मठ लोकांमध्ये विचारसरणी जहालवादी होती. अशावेळी शास्त्रीजींनी मवाळ धोरणात्मक कार्य करून प्रतिबिंबक करून समाजात दाखवले.
1932 वर्षी स्वातंत्र्य चळवळीत शास्त्रीनी भाग घेतला होता म्हणून सहा महिने सक्त कारावास भोगून आले. ते एक देशातील स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले.
त्यांच्या स्वतःच्या कर्तुत्वाने देशाला 80 वर्ष भारतीय संस्कृती, कलासाहित्य, वेदशास्त्र, संस्कृत व संस्कृतीवर अभ्यास करून समाजामध्ये ज्ञानप्रबोधन दिले.पुढे त्यांनी संस्कृत, इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवले.वेद,उपनिषदे, रामायण महाभारत,गीता गाढा अभ्यास करून प्रतिनिध निर्माण केले. हिंदूंचे तत्त्वज्ञानावर समृद्ध ज्ञान आत्मसात केले होते. सामाजिक सुधारणामध्ये अस्पृश्यता, अज्ञान निवारण व अंमलबजावणी करत होत असत. विधवा महिलांचे पुनर्विवाह लावून देत असत.आणि त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देत असत. समाजामध्ये स्थान मिळवून दिले.शास्त्रीजी एक थोर धर्म सुधारक होते. 1950 नंतर पुढे त्यांनी भारताची राज्यघटनेचे संस्कृत मध्ये भाषांतर केले. त्यांनी अनेक हिंदू संस्कृतीचे ग्रंथ लिहिले.सोरटी सोमनाथ मंदिराचा 1951 वर्षी जीर्णोद्धार करून पोराहित्य त्यांनी केले. देशात अनेक व्याख्याने दिली. त्याचबरोबर अनेक परदेशात हिंदू धर्माच्या प्राचीन संस्कृतीचे व्याख्याने देऊन संकल्पना व प्रणाम ग्रंथातील वचने विषयावर धर्मकोशात संकलित करून निर्मिती सुद्धा केली.स्वातंत्र्यानंतर काळातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा धर्मशास्त्र क्षेत्रात सतत अग्रस्थानी करून दिला. वैदिक संस्कृतीचा अभ्यास, विकास,व धर्म शास्त्र प्रसार त्यांनी केला.त्यांच्याकडे प्रचंड बौद्धिक व्यासंगता व आत्मपरीक्षण करत असत. ज्ञानाचे भंडार, तर्कतीर्थ धर्मशास्त्राचे सखोल गाढे अभ्यासक, मराठी विश्वकोशा मंडळाचे अध्यक्ष व संस्थापक, प्राज्ञ मंडळाचे अध्यक्ष, नवभारत मासिकाचे प्रमुख संपादक, धर्मकोशाचे प्रमुख संपादक, स्वत स्वातंत्र्य सैनिक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गोमांतक साहित्य संमेलन अध्यक्ष, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संस्कृत तज्ञ समीक्षक, ज्येष्ठ वक्ते व प्रभुत्वकार, असे व्यासंगी होते. त्यांची वक्तृत्व देशभर व जगभर गाजली गेलीत.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती धर्म कोषाचे अवघड काम सोपवले.व शास्त्री यांनी यशस्वीरित्या परिपूर्ण करून दाखवले.संपूर्ण जगामध्ये मराठी विश्वकोषाचा अखंड ज्ञानगंगा निर्माण करून उपलब्ध करून दिली.शुद्धी स्वर्वशामय हा ग्रंथ त्यांनी लिहिला.आधुनिक शास्त्र, वैदिक शास्त्र,इंग्रजी भाषा ज्ञानशास्त्र,भारताचे औद्योगिक धोरण, या विषयावर देशाला अमूल्य योगदान दिले आणि व्याख्याने दिली.व यावर ग्रंथ संपादित केले.
लक्ष्मणशास्त्री जोशी प्रबोधनकार व्याख्याने महाराष्ट्राला नव्हे देशाला देणारे एकमेव तर्कतीर्थ लाभले होते. आपल्या आयुष्यामध्ये 80 वर्ष ज्ञानाच्या केंद्रभागी होते. भारतीय प्राचीन संस्कृती आणि आधुनिक ज्ञान कार्य त्यांनी दिले. वर्तमान परिषदांमधून जात असताना एक सांस्कृतिक सांगड घालणारे कर्मयोगी मराठी मध्ये होऊन गेले. धर्म रुढीतून परंपरेतून आपला धर्म परांगत करत असताना पुरोगामी,धर्मवादी,विवेक वादी समाज निर्माण केला. हा त्यांच्या अत्यंत मोलाचा एक दगड ठरला. संस्कृत पाठशाला ही राष्ट्रीय गौरवशाही पाठशाला त्यांनी निर्माण केली.समग्र व्यायांगमय,पूर्वाद्ध व उत्तराध ज्ञान प्रबोधन त्यांनी केले.महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मायवेंद्रनाथ रॉय, यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रभाव पडणारे एकमेव शास्त्रीजी होते. 1930 सनातनी साम्राज्याला त्यांनी जागृत करून दिले. साहित्य समीक्षा म्हणजे धर्मकोशावर केलेले प्राज्ञ पाठशालेमध्ये केलेला वैचारिक प्रभाव होता. आणि तो लिखाणातून निर्माण केला.आज पर्यंत मराठी विश्वकोशाचे आधुनिक 40 ग्रंथ( कोष) निर्मिती लक्ष्मणशास्त्री जोशी मुळेच झाली आहे. म्हणूनच आज प्रगत धर्माचा अभ्यास होत आहे. आणि रुजवलेले त्यांचे आचार विचार, ज्योतिषशास्त्र, वेदशास्त्र, कर्मकांड धर्मशास्त्र, वेदांत शास्त्र, ऋग्वेद,संस्कृत, थोर विचारवंत वाङमय निर्मिती संपूर्ण देश व जगाला ज्ञानाची गंगा खुली करून देणारे एकमेव मराठी विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची 27 जानेवारी 2025.ला.125 जयंती झाली.त्यांचे आपल्यासाठी असणारे महान कार्य स्मरणीय आहे. भारत सरकार पोस्टातून त्यांचे टपाल तिकीट प्रकाशित होत आहे.हा खरोखरच महाराष्ट्राचा सुवर्ण योग घडून आला आहे. विद्या वाईनगरीचा अभिमान आहे.
त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान 1954 दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, प्रथम 1955 साहित्य राष्ट्र अकॅडमी पुरस्कार. 1973 वर्षी राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार, 1976 वर्षी सर्वच देशातील तिसरा साहित्य व शिक्षा क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने दिलेला ‘पद्मभूषण पुरस्कार’ देशातील दुसरा सर्वोच्च भारत सरकारचा पुरस्कार 1992 राष्ट्रपती कडून ‘पद्मविभूषण पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला.अशा विद्वत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रत्येक मराठी माणसावर केलेले ज्ञानाचे भंडार ठेवले. मराठी माणसाचा अभिमान आहे. आणि मराठी भाषेचा साता समुद्रपार मराठीचा झेंडा रोवला गेला. अभिमान द्विगणित केला आहे.
2024 ला या कार्यामुळे राज्यभाषेचा अभिजात दर्जा प्राप्त झाला हीच खरी शास्त्रीजींनी मुहूर्त मेढ वाई मध्ये रोवली गेली.मराठी विश्वकोश निर्मिती मोलाचे कार्य निर्माण केले. याच वाईच्या मातीमध्ये उद्योगपती बी.जी शिर्के महाराष्ट्र शाहीर साबळे, यमुनाबाई वाईकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले. बांधकाम व्यवसायिक विष्णू महादेव जोग( व्ही एम. जोग) याच मातीत घडले.अशा महान विद्वान कर्मयोगी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे निधन 27 मे 1994 रोजी कृष्णा नदीच्या उगमस्थान महाबळेश्वर येथे देहवासन झाले.आणि मराठी धर्मकोषात सुवर्णहस्त मध्ये समृद्ध इतिहासात नोंद करून ठेवले. विद्वान तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने मारणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण ‘राज्य सरकारने विचार करावा. हीच खरी त्यांची सार्या महाराष्ट्राला ओळख होऊन जाईल. प्रणाम महान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना आणि त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम.
पर्यावरण संरक्षक, श्री तानाजी फणसे. संपर्क 9821454037













