Thu, Jan 15, 2026
शिक्षण

सातारा जिल्ह्यातील सर्वप्रथम तंबाखूमुक्त शाळांचा झालेल्या तालुका महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील सर्वप्रथम तंबाखूमुक्त शाळांचा झालेल्या तालुका महाबळेश्वर
Ashok Ithape
  • PublishedMarch 22, 2025

पाचगणी : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळा तंबाखूमुक्त करून महाबळेश्वर तालुक्याची सातारा जिल्ह्यातील सर्वप्रथम तंबाखूमुक्त शाळांचा तालुका महाबळेश्वर अशी एक नवीन ओळख निर्माण झाली आहे..

सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज करपे, डॉ. राहूलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा सल्लागार डॉ. दिव्या परदेशी, गटविकास अधिकारी यशवंत भांड, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे तसेच गावागावांमधील शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्षरीता नऊ निकषांची पूर्तता करून घेणाऱ्या विशेष शिक्षिका पूनम घुगे, सलाम मुंबई फॉउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रशांत उबाळे यांनी विशेष योगदान दिले..

तालुक्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व शाळांमध्ये निकषांची पूर्तता करणेसाठी वेळोवेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कार्यवाही करणेत आली आणि नुकताच महाबळेश्वर तालुका तंबाखूमुक्त करण्यात आला, त्याबद्दल तालुकासमन्वयक पूमन घुगे यांचा विशेष सत्कार गटविकास अधिकारी यशवंत भांड यांचे हस्ते करणेत अला..
शाळा तंबाखूमुक्त करणेसाठी सलाम मुंबई फौंडेशन तसेच पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव धनावडे, केंद्रप्रमुख संजय पारठे, दगडू ढेबे, एन.डी.धनावडे, विनायक पवार, चंद्रकांत जंगम, आनंद सपकाळ, विशेष शिक्षक सचिन चव्हाण, श्रीनिधी जोशी, कुलदीप अहिवळे, अभिजीत खामकर, भास्कर कोळी तसेच ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथील गोकुळ जनार्धन मंत्रे एनसीडी समुपदेशक व मोनाली अरुण शिर्के आधीपरिचारिका या सर्वांनी या मोहिमेमध्ये अथक प्रयत्न घेतले..

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!