Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

“वकील आपल्या दारी” देशातली पहिला आणि आगळा वेगळा उपक्रम – मा. राज्यपाल.

“वकील आपल्या दारी” देशातली पहिला आणि आगळा वेगळा उपक्रम – मा. राज्यपाल.
Ashok Ithape
  • PublishedMarch 22, 2025

दिनांक 20/03/2025 रोजी दर्द से हमदर्द तक ट्रस्ट संस्थेच्या स्वयंसेवकांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी संस्थेचे विश्वस्त एड. प्रकाश साळसिंगिकर यांनी संस्थेच्या वतीने सन्मानिय राज्यपाल यांना पुष्पगुच्छ, एड.सुनीता खंडाळे यांनी स्मृतिचिन्ह व एड. सतीश गोरडे यांनी शाल देऊन सत्कार केला.

तद्नंतर प्रकाश साळसिंगिकर यांनी राज्यपाल महोदयांना संस्थेच्या कामाबद्दल सविस्तर माहिती देताना संस्था ही गरीब व गरजू लोकांना कायदेशीर मदत करते तसेच तुरुंगातील कित्येक वर्षे खितपत पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर साहाय्य पुरवते. अशी सर्व माहिती दिली.
तसेच संस्थेच्या हल्लीच शुभारंभ झालेल्या Legal Aid On Wheels “वकील आपल्या दारी ” या प्रकल्पाची माहिती देताना साळसिंगिकर यांनी सांगितले की संस्था ही महाराष्ट्रातील सर्व जेल मधील अतिरिक्त प्रमाणात असलेल्या कैद्यांच्या गंभीर समस्येवर काम करताना तुरुंगामध्ये येणाऱ्यांची देखील संख्या कमी व्हावी या साठी काम करते म्हणजेच गुन्हा घडूच नये यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करते व त्यांच्या समस्या या कोर्टापर्यंत जाण्यापासून थांबवते. तसेच अनेकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन कायदेशीर साहाय्य पुरवते.

सदरचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे असे म्हणत राज्यपाल महोदयांनी ही
“ही देशातली पहिलीच आणि आगळी वेगळी संकल्पना आहे” असे सांगितले व वकील आपल्या दारी या संस्थेच्या गाडीची पाहणी देखील केली व पुढीच वाटचालीस शुभेच्या दिल्या. संस्थेमार्फत लावलेल्या प्रदर्शनी ला सुद्धा माननीय राज्यपाल साहेबांनी भेट दिली व त्यावेळी असे सांगितले की स्थानिक भाषेमध्ये जर वृत्त छापून आले किंवा अन्य सामग्री स्थानिक भाषेत असेल तर जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्रात असल्याने मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, गाव खेड्यातील चौकात बसणारा व्यक्ती वृत्तपत्राचा प्रत्येक भाग वाचून काढत असतो असे त्यांनी सांगितले. जेल मधील अधिकाऱ्यांनी छोट्या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर न्यायालयासमोर हजर केले पाहिजे व न्यायालयांनी त्यांच्या केसेस ऐकून त्वरित निपटारा केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. संस्था करीत असलेले काम महत्त्वाचे असून अशा कामाचे स्वरूप वाढवण्याची गरज आहे असे सांगताना त्यांनी भविष्यात दर्द से हम दर्द तक ट्रस्टच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडेल असे सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संघवी, संस्थेचे एड. सायली गोरडे, एड.गणेश नागरगोजे, एड. नितीन हजारे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी विघ्नेश्वर सुब्रमण्यम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे संस्थेचे कामकाज समजावून सांगितले तर ओमकार पाटील यांनी उपस्थित सर्वांची ओळख करून दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!