लोकसंस्कृतीचा अग्रदूत असणारा समृध्द कलावंत, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा लोक कलाकार पद्मश्री शाहीर साबळे
![]()
लोकसंस्कृतीचा अग्रदूत असणारा समृध्द कलावंत, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा लोक कलाकार पद्मश्री शाहीर साबळे यांचा आज स्मृतिदिन या निमित्ताने…..
स्व. पद्मश्री शाहीर साबळे यांनी आपल्या वीरश्रुत पोवड्यांनी मनोरंजनातून लोकशिक्षण देऊन एक महान सामाजिक कार्य केले. त्यांनी लोककला, लोकनृत्य, लोकनाट्य, मुक्तनाट्य आणि शाहीरीला राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर उच्च उर्जा प्राप्त करुन दिला. मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून दिली. | सांस्कृतिक जीवनात शाहिरांनी मोठे योगदान निर्माण केले. लोक कलेच्या माध्यामतून समाज परिवर्तन केले.
केले. “सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावी जन्म झाला. शाहीरावर संस्कार झाले ते साने गुरुजींचे. अंमळनेरला मामाकडे असताना शाहीर साबळे यांना साने गुरुजींचा सहावास लाभला. त्याच वेळी त्यांनी सिद्राम बसप्पा मुचाटे यांची शाहीरी एकली. वीर झाशीची राणी वीर झाशीची राणी….. | हिनं पालथं पाडुनशान पाजलं इंग्रजांना पाणी हा पोवाडा सिद्राम चुमाटे मोठ्या ऐटीत म्हणायचे, तेच संस्कार शाहीरांवर झाले. ढोलकी फडाच्या तमाशातील पठ्ठे बापूरावांचे गण रांगड्या चालीत सादर व्हायचे. पण या गणांचा रंग खुलवला तो शाहीर साबळे यांनी. कंठाच्या शिरा ताणू न देता कधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना, तसेच शुभंगल चरणी गण नाचला, महाराज गौरी नंदना अशा या विविध गणांची खुमारी काही औरच अशा शाहीर साबळे पार्टीने महाराष्ट्रात प्रेमाचे अधिराज्य गाजवले.
तमाशातील मुक्तपणा आणि नाटकातील अंकांचा चाकोरीबद्ध आराखडा अंगीकारून मराठी लोकरंगभूमीवर प्रहसने आणि मुक्तनाट्ये हा नवा प्रकार शाहीर साबळे यांनी आणला. इतकेच नव्हे तर | मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच मोबाईल थिएटर ही संकल्पना रुजवली. कोंड्याची करामत, | यमराज्यात एक रात्र, माकडाला चढली भांग, नशीब फुटकं सांधून घ्या, असुनी खास मालक घरचा, फुट पायरीचा सम्राट, कशी काय वाट चुकला ? बापाचा बाप, आंधळा दळतंय, कोंडू हवालदार या व अशी अनेक प्रहसने व मुक्तनाट्यांनी शाहीर साबळे यांनी अवघे लोकमानस रंजन आणि लोकशिक्षणाच्या दुहेरी झोपाळ्यावर हलते ठेवले. सन १९६० ते १९७५ अशी १५ वर्षेत्यांनी एकाहून एक सरस लोकनाट्ये बंदिस्त थिएटरात सादर केली. नाटक आणि तमाशा यांच्यात समन्वय साधून मुक्तनाट्ये हा नवा कलाविष्कार लोकांसमोर ठेवला आणि तो बेफाम यशस्वी झाला. जनतेने तर साथ दिलीच; पण चोखंदळ टीकाकार आणि चिकित्सक समीक्षक यांनीही शाहीरांची पाठ थोपटली. माराठी विश्वकोशासारख्या मान्यताप्राप्त ग्रंथात त्याची नोंद झाली आणि मराठीतील मुक्तनाट्याचे जनक म्हणून शाहीरांचे नाव भारतभर प्रख्यात झाले. लोगगीत गायनाच्या क्षेत्रात तर त्यांनी इतिहास रचला. अरे अ वैराळा या कोकेवाल्याच्या गीतापासून अभंग, गवळणी, गण, कोळीगीते, लावणी, खंडोबाची गीते, देवीची गीते, जात्यावरच्या ओव्या, वासुदेवाचे गाणे असे असंख्य लोकगीतांचे प्रकार शाहीरांच्या गात्या गळ्यातून फुलले. आधुनिक मानवाची कहाणी हा साम्यवादावर आधारित दीर्घ पोवाडा म्हणजे शाहीर साबळे यांच्या शाहीरी कारकिर्दीतील शिरपेच होय.
लोकसांस्कृतीतील लोकगीते, लोकनृत्ये, लोककथा, लोकनाट्ये यांची माहिती शाहीरांना बालवयातच पडली. आई जात्यावर दळण दळीत असताना शाहीर तिच्या मांडीवर डोंक ठेवून झोपलेले असायचे. आईच्या जात्यावरच्या ओव्यांच्या संस्कारांतून शाहीरांनी ओव्या करायला सुरुवात यात्रेत बालवयात दिडी, पालखी, भजन, भारुडांचे संस्कार शाहीरांवर झाले. त्यातुनच पुढे या विठूचा केली. 2 गरज, हरिनामाचा झेंडा रोविला यासरखे अभंग शाहीरांच्या प्रासादिक गळ्यातुन उतरला. ज्योतिबा, खंडोबा, भैरवनाथ आदि लोकदैवतांची ठाणी सातारा परिसरातच आहेत. या ज्योतिबा, खंडोबा, भैरोबाच्या यात्रांत वाघ्या-मुरळ्यांचे जागरण शाहीरांनी ऐकले आणि त्यातून जेजूरीच्या खंडेराया जागराला या हे लोकगीत गायिले.
लोकसांस्कृतीतील लोकगीते, लोकनृत्ये, लोककथा, लोकनाट्ये यांची माहिती शाहीरांना बालवयातच पडली. आई जात्यावर दळण दळीत असताना शाहीर तिच्या मांडीवर डॉक ठेवून झोपलेले असायचे. आईच्या जात्यावरच्या ओव्यांच्या संस्कारांतून शाहीरांनी ओव्या करायला सुरुवात केली. | यात्रेत बालवयात दिडी, पालखी, भजन, भारुडांचे संस्कार शाहीरांवर झाले. त्यातुनच पुढे या विठूचा गरज, हरिनामाचा झेंडा रोविला यासरखे अभंग शाहीरांच्या प्रासादिक गळ्यातुन उतरला. ज्योतिबा, खंडोबा, भैरवनाथ आदि लोकदैवतांची ठाणी सातारा परिसरातच आहेत. या ज्योतिबा, खंडोबा, भैरोबाच्या यात्रांत वाघ्या-मुरळ्यांचे जागरण शाहीरांनी ऐकले आणि त्यातून जेजूरीच्या खंडेराया जागराला या हे लोकगीत गायिले. शाहीर एकदा आपल्या साबळे पार्टीचा कार्यक्रम घेऊन कोलकत्याला गेले होते. तेथील वाद्यवृंदाची
परंपरा पाहून शाहीर प्रभावित झले आणि आपणही असा वाद्यवृंद सुरु करावा, असे त्यांच्या मनात आले.
त्यातूनच महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचा उदय झाला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या महाराष्ट्राची लोकधाराचे उद्घाटन झाले. चारुशीला साबळे, प्रशांत दामले, विजय कदम, भरत जाधव, देवदत्त साबळे, मंगेश दत्त आदि कलावंत प्रथमतः महाराष्ट्राच्या लोकधारेत काम करत असत. महाराष्ट्राच्या लोकधारेची परंपरा पुढे शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी चालविली आहे. शाहीर साबळे यांनी आपली शाहीरी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंत चव्हण, पंडित नेहरु, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, कॉम्रेड डांगे अशा अनेक राजकीय नेत्यांसमोर तसेच लता मंगेशकर, राज कपूर अशा ज्येष्ठ कलावंतासमोर शाहीर साबळे यांनी अस्सल शाहीरी सादर केली. साम्यवादी लेखक कलावंतासोबत त्यांनी रशिया वारीही केली. मॉरिशसला महाराष्ट्राची लोकधारा सादर केली. दिल्लीला अनेक | मुक्तनाट्ये सादर केलीत शाहीर साबळे यांचे आंधळं दळतंय हे नाटक म्हणजे शिवसेनच्या प्रसव वेदना होत्या, असा शाहीरांचा सार्थ गौरव शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी केला होता.
मुबईनगरिवरचे शाहीर साबळे यांचेच प्रेम मोठे अतुट आहे म्हणुनच मुबईतील वाढत्या लोंढ्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना शाहीरांची प्रतिभा उपहास अधोरेखित करीत खुलते, ती अशी मराठीचा मळवट पुसला, राहिली टिकली।
आम्ही आमच्या हातेने, मुंबई सारी फुकली ।।
पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्रात गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार, नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद असे विविध मान-सन्मान प्राप्त झालेल्या शाहीरांनी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली…..!
लेखक : शिवाजीराव शिर्के













